Jio चे स्वस्त IUC रिचार्ज, 100 GB पर्यंत डेटा आणि इतर नेटवर्कसाठी 14074 मिनिटे

Jio चे स्वस्त IUC रिचार्ज, 100 GB पर्यंत डेटा आणि इतर नेटवर्कसाठी 14074 मिनिटे

IUC टॉप अप व्हाउचर्सची खास गोष्ट म्हणजे अनलिमिटेड व्हॅलिडिटी असल्यानं पॅक संपेपर्यंत वापरता येईल.

  • Share this:

नवी दिल्ली, 18 मार्च : रिलायन्स जिओने गेल्या वर्षी त्यांच्या सर्व रिचार्जला आय़युसी ट़ॉप अप मध्ये कनव्हर्ट केलं होतं. ज्यांना जिओशिवाय इतर नेटवर्कवर कॉल करायचं आहे त्यांच्यासाठी आययुसी होते. कंपनी अजुनही जिओ टू जिओ अनलिमिटेड कॉलिंग देत आहे. रिलायन्स जिओ युजर्सना 6 आययुसी टॉप अप व्हाउचरची ऑफर देत आहे. ही व्हाउचर्स 10 ते 1000 रुपयांपर्यंत आहेत. यामध्ये 14 हजार रुपयांपेक्षा जास्त कॉलिंग मिनिटांसह 100 जीबी डेटाही दिला जात आहे.

सर्वात स्वस्त असलेला 10 रुपयांचा आययुसी टॉप अप 10 रुपयांचा आहे. यामध्ये 1 जीब डेटासह 7.47 रुपयांचा टॉकटाइम आणि 124 आययुसी मिनिटे मिळतात. जिओच्या काही प्रीपेड प्लॅनवर आययुसी मिनिट मिळत नाहीत. त्यावेळी इतर नंबरवर कॉल करण्यासाठी 10 रुपयांचे आययुसी टॉप अप व्हाउचर फायद्याचे आहे. यामध्ये 20 रुपयांच्या प्लॅनमध्ये 2 जीबी डेटा, 14.95 रुपयांचा टॉकटाइम आणि 249 आययुसी मिनिटं मिळतात.

आययुसीच्या खास प्लॅनमध्ये 50 रुपयांचा रिचार्ज आहे. यात इतर नेटवर्कवर कॉलसाठी 656 मिनिटे आणि 39.37 रुपयांचा टॉकटाइम मिळतो. त्याशिवाय 5 जीबी इंटरनेट डेटाही मिळतो. तर 100 रुपयांच्या प्लॅनवर 10 जीबी डेटा आणि 1362 मिनिटं नॉन जिओ कॉलसाठी मिळतील.

जिओने 500 रुपयांचे आय़युसी टॉप अप व्हाउचर दिलं आहे. यात 50 जीबी डेटा आणि 420.73 रुपयांचा बॅलन्स मिळणार आहे. तर इतर नेटवर्कवर कॉलिंगसाठी 7012 मिनिटे मिळतील. याशिवाय 1000 रुपयांचा प्लॅनही असून यावर 100 जीबी डेटा मिळणार आहे. सोबत 844.46 रुपये टॉकटाइम आणि 14074 नॉन जिओ मिनिटं मिळतील. आययुसी टॉप अप व्हाउचर्सची खास गोष्ट म्हणजे त्याला कोणतीही मुदत नाही. अनलिमिटेड व्हॅलिडिटी असल्यानं कधीपर्यंतही वापरता येतील.

First published: March 18, 2020, 1:32 PM IST

ताज्या बातम्या