Jio कडून या प्लानच्या किमतीत वाढ; अधिक पैसे खर्च करावे लागणार

Jio कडून या प्लानच्या किमतीत वाढ; अधिक पैसे खर्च करावे लागणार

या प्लानमध्ये युजर्सला 15 जीबी डेटा मिळतो. लिमिट पूर्ण झाल्यानंतर युजर्सला 64 Kbps स्पीड डेटा मिळेल. या प्लानमध्ये युजरला एक वर्षासाठी Disney+ Hotstar VIP सब्सक्रिप्शन मिळतं.

  • Share this:

नवी दिल्ली, 25 ऑक्टोबर : रिलायन्स जीओने आपल्या 222 रुपयांच्या Disney Hotstar VIP पॅकची किंमत वाढवली आहे. जीओने जूनमध्ये Disney Hotstar ची एक सीरीज जारी केली होती, ज्याती सुरुवातीची किंमत 222 रुपये होती. आता या रिचार्जची किंमत वाढवण्यात आली आहे. या प्लानच्या किंमतीत 33 रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळे Disney Hotstar VIP चा जीओ प्लान आता 222 रुपयांऐवजी 255 रुपये झाला आहे.

जीओच्या या 255 रुपयांच्या Disney Hotstar VIP प्लानमध्ये युजर्सला Disney Hotstar VIPचं सब्सक्रिप्शन मिळतं. हा प्लान Exclusive Limited Period Upgrade Offer अंतर्गत उपलब्ध आहे. या प्लानचा वापर करण्यासाठी युजरकडे एक ऍक्टिव्ह व्हॉईस कॉलिंग पॅक असणं गरजेचं आहे.

(वाचा - एकदा चार्ज केल्यावर 200 किलोमीटर चालते ही स्कूटर; जाणून घ्या किंमत)

या प्लानमध्ये युजर्सला 15 जीबी डेटा मिळतो. लिमिट पूर्ण झाल्यानंतर युजर्सला 64 Kbps स्पीड डेटा मिळेल. या प्लानमध्ये युजरला एक वर्षासाठी Disney Hotstar VIP सब्सक्रिप्शन मिळतं.

याव्यतिरिक्त जीओ काही इतर प्लानसह Disney Hotstar VIP सब्सक्रिप्शन देते. कंपनी 499 रुपयांचा प्लान देते, ज्याची वैधता 56 दिवस असते. युजर्सला प्रतिदिन 1.5 जीबी डेटा मिळतो. मात्र हा प्लान स्टँड अलोन प्लान असल्याने यात व्हॉईस कॉलिंग लाभ मिळत नाही. यात Disney Hotstar VIP आणि जीओ ऍप्सचं एक वर्षापर्यंत फ्री सब्सक्रिप्शन मिळतं.

(वाचा - चिनी सामनावरील बॅननंतरही 'या' चायनिज स्मार्टफोनची भारतात सर्वाधिक विक्री)

Published by: Karishma Bhurke
First published: October 25, 2020, 3:20 PM IST

ताज्या बातम्या