मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /

जिओ फायबरचं भारतात 11 लाख किमीचं जाळं, Jio Fiber बनला देशातील सर्वात मोठा FTTX सर्व्हिस प्रोव्हायडर : मुकेश अंबानी

जिओ फायबरचं भारतात 11 लाख किमीचं जाळं, Jio Fiber बनला देशातील सर्वात मोठा FTTX सर्व्हिस प्रोव्हायडर : मुकेश अंबानी

जिओ फायबरचं भारतात 11 लाख किमीचं जाळं, दिवाळीपूर्वी 5G नेटवर्कही होणार सुरु : मुकेश अंबानी

जिओ फायबरचं भारतात 11 लाख किमीचं जाळं, दिवाळीपूर्वी 5G नेटवर्कही होणार सुरु : मुकेश अंबानी

Jio fiber optic Network: रिलायन्स इंडस्ट्रीजची 45 वी वार्षिक सर्वसाधारण सभा (AGM) आज पार पडली. AGM मध्ये बोलताना रिलायन्स समूहाचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी सांगितलं की, जिओचं आखिल भारतीय फायबर ऑप्टिक नेटवर्क 11 लाख किलोमीटरपेक्षा जास्त आहे, जे पृथ्वीला 27 फेऱ्या मारू शकतं.

पुढे वाचा ...
  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Suraj Sakunde

मुंबई, 29 ऑगस्ट: रिलायन्स इंडस्ट्रीजची 45 वी वार्षिक सर्वसाधारण सभा (AGM) आज पार पडली. AGM मध्ये बोलताना रिलायन्स समूहाचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी सांगितलं की, जिओचं आखिल भारतीय फायबर ऑप्टिक नेटवर्क 11 लाख किलोमीटरपेक्षा जास्त आहे, जे पृथ्वीच्या सर्वबाजूंना 27 वेळा फेरा मारू शकतं. रिलायन्स जियोच्या AGMला संबोधित करताना मुकेश अंबानी म्हणाले की, जियोचं फिक्स्ड लाईन नेटवर्क (Fixed line Network) हाय क्वालिटी ऑप्टीक नेटवर्कवर आधारित आहे. त्यामुळं भारताच्या कानाकोपऱ्याला इंटरनेटशी जोडू शकते. सध्या जियोचा पेन इंडिया फेबरिक ऑप्टिक नेटवर्क 11 लाख किलोमीटरपेक्षा जास्त आहे.

मुकेश अंबानी यांनी पुढे सांगितलं की, जियो फायबर देशातील सर्वात मोठा FTTX सर्व्हिस प्रोव्हायडर बनला आहे. याच्यासोबत 70 लाखांहून अधिक प्रिमायसेस जोडले गेले आहेत. कोविड महामारीच्या काळातही गेल्या दोन वर्षात हे यश मिळवता आलं आहे. गेल्या 1 वर्षाच्या काळात जियो फायबरच्या मागणीतही वाढ झाली आहे. प्रत्येक नव्या 3 ग्राहकांपैकी 2 ग्राहक जियो फायबरची निवड करत आहेत. अंबानींनी हेही सांगितलं की या मोठ्या वाढीनंतर फिक्स ब्रॉडबँड सेवांच्या बाबतीत भारत जगातील इतर देशांच्या तुलनेत खूप पिछाडीवर आहे. भारतात फिक्स्ड ब्रॉडबँडची फक्त 2 कोटी कनेक्शन आहेत आणि भारत याबाबतीत 138व्या क्रमांकावर येतो.

विकसित देशांच्या विपरित भारतात अधिकांश घरं, ऑफिस आणि व्यवसायिक ठिकाणी ब्रॉडबँड आणि इनडोअर वायफाय सुविधांपासून वंचित आहेत. आपल्याला या स्थितीत बदल घडवायचा आहे, असंही ते म्हणाले. भारताला फिक्स्ड ब्रॉडबँड कनेक्शनच्या बाबतीत जगातील टॉप 10 देशांमध्ये समाविष्ट करण्यासाठी आपण कटीबद्ध आहोत, असंही ते म्हणाले.

हेही वाचा- रिलायन्सचा रोजगार निर्मितीत नवा विक्रम, मुकेश अंबानी यांची Reliance 45th AGM मध्ये माहिती

 देशात दिवाळीपूर्वी लाँच होणार 5G सेवा: 

गेल्या काही दिवसांपासून देशात 5G सेवेचा शुभारंभ कधी होणार याची चर्चा सुरु आहे. रिलायन्स जिओ आणि एअरटेल या दोन्ही टेलिकॉम कंपन्या 5G सेवा सुरु करण्यास सज्ज आहेत. त्यामुळं आज होणाऱ्या रिलायन्स समूहाच्या वार्षिक सर्वसाधारण  सभेकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं होतं. या सभेदरम्यान रिलायन्स समूहाचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी दिवाळीपूर्वी देशात जिओ 5G ची सुरु होणार असल्याची घोषणा केली.  पहिल्या टप्प्यात देशातील प्रमुख महानगरांमध्ये 5 G सेवा सुरु होणार आहे.  मुंबईमध्ये दिवाळीपूर्वी जिओ 5G सेवा लाँच होणार आहे.

(Disclaimer: Network18 आणि News18lokmat चॅनेल/वेबसाइट ची संचालक संस्था ही एक स्वतंत्र मीडिया ट्रस्ट आहे ज्यामध्ये रिलायन्स इंडस्ट्रीज एकमेव लाभार्थी आहे.)

First published:

Tags: Mukesh ambani, Reliance, Reliance Jio