Jio च्या नव्या रिचार्जवर 300 टक्के जास्त फायदे, NEW ALL-IN-ONE PLANS ची घोषणा

टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओने बुधवारी 'NEW ALL-IN-ONE PLANS' ची घोषणा केली.

  • Share this:

नवी दिल्ली, 05 डिसेंबर : टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओने बुधवारी 'NEW ALL-IN-ONE PLANS' ची घोषणा केली. जिओने याबाबत एक डिसेंबरला माहिती दिली होती. या प्लॅनमध्ये ग्राहकांना 300 टक्क्यांपेक्षा जास्त फायदा दिला जाणार आहे. कंपनीने म्हटलं की, जिओ जगातील सर्वात कमी किंमतीत सर्वोत्तम सेवा देण्याचं वचन देते. टेलिकॉम इंडस्ट्रीमधील सर्वात स्वस्त असा हा प्लॅन आहे. 6 डिसेंबरला हा प्लॅन सुरु होईल. NEW ALL-IN-ONE PLANS नुसार ग्राहकांना दररोज दीड जीबी इंटरनेट डेटा मिळेल.

199 रुपयांच्या प्लॅनची मुदत एक महिना असेल. यामध्ये जिओ टू जिओ अनलिमिटेड कॉल्स करता येतील. जिओशिवाय दुसऱ्या नेटवर्कवर एक हजार मिनिटे बोलता येईल. एक महिना म्हणजे 28 दिवसांसाठी हा प्लॅन असेल.

399 रुपये किंमतीच्या प्लॅनमध्ये दीड जीबी डेटा मिळेल. 2 महिने मुदतीच्या या प्लॅनमध्ये जिओ टू जिओ अनलिमिटेड तर दुसऱ्या नेटवर्कवर 2 हजार मिनिटे कॉल करता येणार आहे.

3 महिन्यांसाठी जिओने 555 रुपयांचा प्लॅन लाँच केला आहे. यानुसार युजर्सना दरदिवशी दीड जीबी डेटा मिळणार आहे. जिओ टू जिओ अनलिमिटेड तर इतर नेटवर्कसाठी 3 हजार मिनिटे कॉलिंग मिळणार आहे.

एक वर्षासाठी 2 हजार 199 रुपयांचा प्लॅन आहे. यामध्ये दररोज दीड जीबी इंटरनेट, जिओ टू जिओ अनलिमिटेड कॉलिंग, इतर नेटवर्कवर 12 हजार मिनिटे कॉलिंग मिळेल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 5, 2019 08:30 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading