Jio, Airtel, Vodafone-Idea चे एक वर्षासाठी खास प्लॅन, रिचार्जवर बंपर ऑफर

Jio, Airtel, Vodafone-Idea चे एक वर्षासाठी खास प्लॅन, रिचार्जवर बंपर ऑफर

प्रीपेडच्या रिचार्जमध्ये दरवाढ केल्यानंतर आता कंपन्यांनी एक वर्षासाठीचे प्लॅन लाँच केले आहेत. यात अनलिमिटेड कॉलिंग, इंटरनेट डेटा आणि एसएमएस देण्यात येणार आहेत.

  • Share this:

रिलायन्स जिओ, एअरटेल, व्होडाफोन-आयडियाने त्यांच्या प्रीपेड प्लॅनमध्ये वाढ केली आहे. यात 40 ते 50 टक्क्यांची वाढ झाली आहे. त्यानंतर एअरटेल, व्होडाफोन-आयडियाने नवीन प्लॅन लाँच केले. तर जिओनं वार्षिक प्लॅन लाँच केला आहे. दर वाढल्यानंतरही कंपन्यांमध्ये स्पर्धा आहे. सध्या एक महिना, दोन किंवा तीन महिन्यांचे प्लॅन सर्वाधिक वापरतात. आता कंपन्यांनी वार्षिक प्रीपेड प्लॅन्स लाँच केले आहेत.

व्होडाफोन-आयडियाने 1499 आणि 2399 रुपयांचा प्लॅन एक वर्षासाठी दिला आहे. यामध्ये इंटरनेट डेटा आणि एसएमएससह अनलिमिटेड फ्री कॉलिंग दिलं जाणार आहे. याशिवाय 499 रुपयांचे व्होडाफोन प्ले आणि 999 रुपयांचे झी5 चे सबस्क्रिप्शनही फ्री मिळणार आहे.

2399 रुपयांच्या प्लॅनमध्ये वर्षभर दररोज दीड जीबी डेटा दिला जाणार आहे. याशिवाय अनलिमिटेड कॉलिंग, दररोज 100 फ्री एसएमएससुद्धा असणार आहेत. यावरसुद्धा व्होडाफोन प्ले आणि 999 रुपयांचे झी5 चे सबस्क्रिप्शनही फ्री मिळणार आहे.

एअरटेलनं 1498 रुपये आणि 2398 रुपयांचे प्लॅन दिले आहेत. 1498 रुपयांत युजर्सना 24 जीबी डेटा दिला जात आहे. यामध्ये सर्व नेटवर्कवर फ्री कॉलिंग करता येणार आहे.  याशिवाय म्यूझिक, एअरटेल एक्स्ट्रिमचं फ्री सबस्क्रिप्शनसह 3600 एसएमएसही मिळणार आहेत. तर 2398 रुपयांच्या प्लॅनमध्ये वर्षभर दररोद दीड जीबी डेटा आणि 100 एसएमएस फ्री मिळणार आहेत.

रिलायन्स जिओनं 1299 आणि 2199 रुपयांचे प्लॅन लाँच केले आहेत. 1299 रुपयांच्या प्लॅनमध्ये 365 दिवसांची मुदत मिळणार असून 24 जीबी इंटरनेट दिलं जाणार आहे. यात 3600 एसएमएस आणि जिओ अॅप्सचे सबस्क्रिप्शन फ्री मिळणार आहेत. तसेच जिओ नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग तर इतर नेटवर्कसाठी 12 हजार मिनिट कॉलिंग फ्री मिळेल.

जिओचा 2199 रुपयांचा एक वर्षासाठीचा प्लॅनही आहे. यामध्ये दररोज दीड जीबी इंटरनेट डेटा मिळणार आहे. याशिवाय 1299 च्या प्लॅनमध्ये मिळणाऱ्या सर्व सेवा मिळणार आहेत.

Published by: Manoj Khandekar
First published: December 26, 2019, 10:17 AM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading