मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /

Jio चा जबरदस्त प्लॅन; एकदा रिचार्ज करून वर्षभर मिळवा अनलिमिटेड कॉलिंग आणि बरंच काही

Jio चा जबरदस्त प्लॅन; एकदा रिचार्ज करून वर्षभर मिळवा अनलिमिटेड कॉलिंग आणि बरंच काही

या प्लॅनमध्ये 3600 SMS फ्री मिळतात. त्याशिवाय जिओ ऍप्सचं सब्सक्रिप्शनही ग्राहकांना फ्रीमध्ये दिलं जातं. या रिचार्ज प्लॅनमध्ये ग्राहकांना अनलिमिटेड वॉईस कॉलची सुविधाही आहे.

  • Published by:  Karishma
नवी दिल्ली, 24 जानेवारी : स्वस्त रिचार्जमध्ये रिलायन्स जिओचं (Reliance Jio) नाव अनेकदा वरच्या क्रमांकावर असतं. जिओकडून ग्राहकांच्या सोयीसाठी स्वस्त रिचार्ज प्लॅन ऑफर केले जातात. जिओचे एक वर्षासाठीचे अनेक प्लॅन आहेत. जिओचे वर्षभरासाठीचे 2,599 रुपये, 2,399 रुपये आणि 2121 रुपयांचे प्लॅन आहेत. अशाप्रकारचा जिओचा वर्षभरासाठीचा आणखी एक 1,299 रुपयांचा एक रिचार्ज प्लॅन आहे. एकदा रिचार्ज केल्यानंतर जपवळपास वर्षभर याचा फायदा मिळवता येणार आहे. जिओच्या या 1,299 रुपयांच्या प्लॅनची वॅलिडिटी 336 दिवस आहे. हा प्लॅन रिचार्ज करायचा असल्यास, जिओ वेबसाईटवर ‘Other’ कॅटेगरीमध्ये मिळेल. हा प्रीपेड प्लॅन ग्राहकांना एकूण 24GB डेटा ऑफर करतो. कंपनीकडून ऑफर करण्यात येणारा हायस्पीड 24GB डेटा संपल्यानंतर याचा स्पीड कमी होऊन 64Kbps होतो.

(वाचा - सावधान! तुम्हालाही हा मेसेज आलाय का? गृह मंत्रालयाकडून फसवणुकीबाबत अलर्ट जारी)

Jio 1,299 रुपये के प्लान में 336 दिन की वैलिडिटी मिलती है.

(वाचा - Airtel चे 2 नवे रिचार्ज प्लॅन;केवळ 78 रुपयांत 5GB डेटासह मिळेल अनलिमिडेट म्युझिक)

या प्लॅनमध्ये 3600 SMS फ्री मिळतात. त्याशिवाय जिओ ऍप्सचं सब्सक्रिप्शनही ग्राहकांना फ्रीमध्ये दिलं जातं. या रिचार्ज प्लॅनमध्ये ग्राहकांना जिओ-टू-जिओ आणि इतर नेटवर्कसाठीही अनलिमिटेड वॉईस कॉलची सुविधा आहे. दरम्यान, रिलायन्स Jio ने 1 जानेवारीपासून पुन्हा एकदा कॉलिंग सेवा विमामूल्य केली आहे. ज्या ग्राहकांनी जिओचं सब्स्क्रिप्शन घेतलं आहे त्यांना या सुविधेचा लाभ घेता येणार आहे. जिओने IUC पूर्णपणे बंद केला असून आता 1 जानेवारीपासून विनामूल्य कॉलिंग करता येणार आहे. IUC अर्थात interconnect usage charges म्हणजेच, जिओ ते इतर नेटवर्कशी कॉल करण्यासाठी आकारण्यात आलेले पैसे. आधी जिओ यासाठी 14 पैसे आकारत होतं, तर नंतर 7 पैसे आकारले जात होते. आता हा चार्ज हटवण्यात आला असून विनाशुल्क कॉलिंग 1 जानेवारीपासून करता येणार आहे.
First published:

Tags: Recharge, Reliance Jio

पुढील बातम्या