Jio चा धमाकेदार प्लॅन, एका रिचार्जमध्ये वर्षभर अनलिमिटेड सर्विस

Jio चा धमाकेदार प्लॅन, एका रिचार्जमध्ये वर्षभर अनलिमिटेड सर्विस

नववर्षानिमित्त Jio ने ग्राहकांसाठी ‘2020 Happy New Year Offer’लाँच केली आहे.

  • Share this:

मुंबई, 24 डिसेंबर : रिलायन्स जिओने नव्या वर्षानिमित्त धमाकेदार ऑफर दिली आहे. नववर्षाच्या निमित्ताने ग्राहकांसाठी ‘2020 Happy New Year Offer’लाँच केली आहे. यामध्ये एकदाच रिचार्ज करून वर्षभर अनलिमिटेड सर्विसचा फायदा मिळणार आहे. जिओचा ‘2020 happy new year offer’प्लॅन मर्यादित कालावधीसाठी आहे. या ऑफरची सुरुवात 24 डिसेंबरपासून होणार आहे.

जिओच्या '2020 हॅपी न्यू ईयर ऑफर' मध्ये युजरला 2020 रुपयांचा रिचार्ज केल्यानंतर वर्षभर अनलिमिटेड सर्विस मिळेल. यामध्ये वर्षभर अनलिमिटेड व्हाइस कॉलिंग, दररोज दीड जीबी इंटरनेट, 100 एसएमएस आणि जिओ अॅप्सचा मोफत अॅक्सेस मिळणार आहे. याची मुदत 365 दिवस म्हणजेच एक वर्षभर असेल.

JioPhone साठीसुद्धा कंपनीने ऑफर दिली आहे. यामध्ये 2020 रुपयांचे पेमेंट केल्यानंतर जिओफोन देण्यात आला आहे. तसेच यासोबत 12 महिन्यांची अनलिमिटेड सर्विसही दिली जाणार आहे.

जिओ फोनवर अनलिमिटेड व्हाइस कॉलिंग, दररोज 0.5 जीबी डेटा, एसएमए आणि जिओ अॅप्सचे मोफत सबस्क्रिप्शन मिळणार आहे. या ऑफरची मुदत 12 महिने इतकी असणार आहे.

Published by: Manoj Khandekar
First published: December 24, 2019, 10:45 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading