Home /News /technology /

फक्त 6,666 रुपयांच्या EMI मध्ये घरी घेऊन या JAWA पेराक, 'ही' आहे स्वस्त आणि मस्त ऑफर!

फक्त 6,666 रुपयांच्या EMI मध्ये घरी घेऊन या JAWA पेराक, 'ही' आहे स्वस्त आणि मस्त ऑफर!

स्टाइलिंग आणि इंजन -पेरक बाइकची स्टाइलिंग ही भारतीय बाजारात सध्या असलेल्या इतर जावा बाइकपेक्षा वेगळी आहे

    मुंबई, 07 जानेवारी : नवदीच्या दशकात आपला दबदबा निर्माण करणाऱ्या जावा मोटरसायकल (Jawa Motorcycle) ने पेराक मॉडेल लाँच करून अनेक धमाकेदार ऑफर दिल्या आहे. ही बाईक जर तुम्हाला घ्यायची असेल तर त्यावर खास ऑफर सध्या सुरू आहे. जावा कंपनीने झिरो डाउन पेमेंट (Zero Down Payment) वर सुद्धा खरेदी करता येणार आहे. फक्त यासाठी तुम्हाला कोणतीही रक्कम डाऊनपेमेंट करावी लागणार नाही. फक्त 6,666 रूपये EMI वर ही बाईक विकत घेता येईल. जावा पेराकही भारतात नोव्हेंबर महिन्यात लाँच करण्यात आली. 1 जानेवारीपासून या बाईकच्या विक्रीला सुरुवात झाली आहे. बुकिंग करण्यासाठी तुम्हाला 10 हजार रूपये रक्कम भरावी लागत होती ही रक्कम रिफंडेबल आहे. जावा कंपनीने या आधी java Classic आणि 42 लाँच केली होती. कंपनीने 1.95 लाख रुपये एक्स शोरूम किंमतीवर बॉबर Perak ही बाइक लाँच केली. कंपनीने आधी Perak बाइक 1.89 लाख रुपये किंमतीत लाँच करणार असं म्हटलं होतं. परंतु, आता बीएस-6 इंजिन असल्यामुळे किंमतीत वाढ केली. स्टाइलिंग आणि इंजन -पेरक बाइकची स्टाइलिंग ही भारतीय बाजारात सध्या असलेल्या इतर जावा बाइकपेक्षा वेगळी आहे. ही एक बॉबर स्टाइल बाइक आहे. यात स्विंगआर्म आणि मागे ट्विन सस्पेंशनच्या जागी एकच मोनोशॉक सस्पेंशन दिलं आहे. जावा Classic आणि 42 मध्ये जिथे ड्रम ब्रेक सेटअप आहे. तिथे Parek मध्ये डुअल चॅनल ABS सोबत मागे आणि समोर डिस्क ब्रेक्स दिले आहे. विशेष म्हणजे, या बाइकमध्ये एकच सिंगल सीट आहे. इंजिन - Perak बाइमध्ये 334cc liquid-cooled single-cylinder इंजिन दिले आहे. ज्यामुळे 30.4bhp पॉवर आणि 31Nm चा टॉर्क जनरेट होईल. पॉवर आणि टॉर्कच्या तुलनेत ही बाइक Classic आणि Forty Two ला मागे सोडते. सोबतच या बाइकमध्ये 6 स्पीड गिअर बॉक्स दिला आहे. देशभरात जावा बाइकची लोकप्रियता चांगली आहे. कंपनीने देशभरात 85 शहरांमध्ये 100 डिलरशिप्स उभारले आहे. या बाइकचा थेट सामना हा रॉयल एनफील्डच्या 350cc आणि 500cc बाइकशी होणार आहे. Royal Enfield Thunderbird 350X ची दिल्लीमध्ये ऑन-रोड किंमत जवळपास 1.78 लाख आहे. तर 500cc Royal Enfield Classic 500 ची किंमत ही जवळपास 2.02 लाख आहे. जर जावा आणि Thunderbird मध्ये तुलना केली तर तिथे जावा 30.4bhp पॉवर देत तिथे रॉयल एनफील्ड 350cc बाइक फक्त 20bhp आणि 500cc बाइक 27bhp पॉवर देते. त्यामुळे जावा Perak या दोन्ही बाईकला मागे टाकते.
    Published by:sachin Salve
    First published:

    पुढील बातम्या