मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /

जनधन बँक खाते Aadhar Card शी लिंक करणं गरजेचं, नाहीतर होतील बरेच तोटे; जाणून घ्या प्रोसेस

जनधन बँक खाते Aadhar Card शी लिंक करणं गरजेचं, नाहीतर होतील बरेच तोटे; जाणून घ्या प्रोसेस

जनधन खात्याचे बरेच फायदे आहेत, मात्र हे सगळे फायदे (Jan Dhan account benefits) मिळवण्यासाठी तुम्हाला सर्वांत आधी आपलं आधार कार्ड (Aadhar card) जनधन खात्याला लिंक करावं लागेल.

जनधन खात्याचे बरेच फायदे आहेत, मात्र हे सगळे फायदे (Jan Dhan account benefits) मिळवण्यासाठी तुम्हाला सर्वांत आधी आपलं आधार कार्ड (Aadhar card) जनधन खात्याला लिंक करावं लागेल.

जनधन खात्याचे बरेच फायदे आहेत, मात्र हे सगळे फायदे (Jan Dhan account benefits) मिळवण्यासाठी तुम्हाला सर्वांत आधी आपलं आधार कार्ड (Aadhar card) जनधन खात्याला लिंक करावं लागेल.

नवी दिल्ली, 29 एप्रिल: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (PM Narendra Modi) 2014 साली स्वातंत्र्यदिनाचं औचित्य साधून देशातील नागरिकांसाठी जनधन योजना (Jan Dhan Yojana) सुरू केली होती. या योजनेअंतर्गत देशातील कोणतीही व्यक्ती झीरो बॅलन्स बँक अकाउंट (Zero Balance savings account) सुरू करू शकते. या योजनेअंतर्गत सुरू करण्यात आलेल्या बँक अकाऊंट्सची संख्या जानेवारी 2022 मध्ये तब्बल 44.23 कोटी एवढी झाली होती. यातूनच ही योजना केवढी लोकप्रिय झाली हे स्पष्ट होतं.

केंद्रीय अर्थ मंत्रालयाकडून मिळालेल्या आकडेवारीनुसार, या वर्षीच्या जानेवारीपर्यंत जनधन खात्यांमध्ये (Jan Dhan Bank accounts) जमा असलेली एकूण रक्कम ही 1.5 लाख कोटी रुपयांहून अधिक आहे. एकूण जनधन खात्यांपैकी 34.9 कोटी खाती ही सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमध्ये, 8.05 कोटी खाती ग्रामीण बँकांमध्ये, तर 1.28 कोटी खाती ही खासगी बँकांमध्ये उघडण्यात आली आहेत. जनधन खात्याचे बरेच फायदे आहेत, मात्र हे सगळे फायदे (Jan Dhan account benefits) मिळवण्यासाठी तुम्हाला सर्वांत आधी आपलं आधार कार्ड (Aadhar card) जनधन खात्याला लिंक करावं लागेल.

जनधन खात्याचे फायदे

जनधन बचत खात्याचे कित्येक फायदे (Benefits of Jan Dhan account) आहेत. एक तर हे झीरो बॅलन्स सेव्हिंग्स अकाउंट आहे, त्यामुळे खात्यामध्ये काहीच रक्कम नसली, तरी त्यावर कोणताही दंड आकारला जात नाही किंवा खातं बंद केलं जात नाही. सोबतच ओव्हरड्राफ्ट आणि रूपे कार्ड अशा सुविधादेखील जनधन खातेधारकाला देण्यात येतात. सोबतच जनधन खातेधारकाला विमा संरक्षणही मिळतं.

आधार कार्ड लिंक नसेल तर नुकसान

जनधन खातेधारकाला मिळणाऱ्या रूपे डेबिट कार्डवर (RuPay Debit card) 1 लाख रुपयांपर्यंतचा अपघात विमा (Insurance cover with Jan Dhan account) देण्यात येतो. सोबतच, जनधन अकाउंट असणाऱ्या व्यक्तीला 30 हजार रुपयांचं अपघाती मृत्यू विमा (Accidental Death Insurance) संरक्षणही देण्यात येतं. सोबतच जनरल इन्शुरन्स कव्हरही जनधन खातेधारकाला दिलं जातं. मात्र, या सर्व सुविधा मिळवण्यासाठी खातेधारकाचे आधार कार्ड जनधन खात्याशी लिंक (Aadhar link with Jan Dhan account) असणे गरजेचे आहे. आधार आणि जनधन अकाउंट लिंक नसल्यास अशा महत्त्वाच्या सुविधांना खातेधारक मुकू शकतात.

अशा प्रकारे करा लिंक

  • जनधन खात्याला आधारशी लिंक करण्यासाठी सर्वांत आधी ज्या बँकेत तुमचं खातं आहे तिथं जा.
  • यावेळी तुम्हाला तुमच्या आधारची फोटोकॉपी आणि बँक पासबुक सोबत न्यावं लागेल.
  • बँकेत तुम्हाला यासंबंधीचा फॉर्म भरावा लागेल, ज्यानंतर तुमचं आधार आणि बँक खातं लिंक होईल.
  • SBI सोबतच कित्येक बँका केवळ SMS मार्फत आधार-बँक खातं लिंक करण्याची सुविधा देतात.
  • यासाठी बँक अकाउंटसोबत रजिस्टर्ड असणाऱ्या मोबाईल नंबरवरून UIDआधार नंबरअकाउंट नंबर एवढेच टाईप करून 567676 या नंबरवर तो मेसेज पाठवायचा आहे.
  • तुम्ही बँकेच्या एटीएम मशीनमधूनदेखील आधार तुमच्या खात्याला लिंक करू शकता.
  • अशा प्रकारे काही सोप्या स्टेप्सनी तुम्ही तुमचं आधार कार्ड जनधन खात्याला लिंक करून, सरकारच्या कित्येक योजनांचा लाभ घेऊ शकता.

First published:

Tags: Aadhar card, Aadhar card link