भोपाळ 25 मार्च : बुंदेलखंडमधील सागरमध्ये इलेक्ट्रिकल ट्रेडमधून आयटीआय करणाऱ्या तरुणाने आयपीएस अॅड्रेसवर चालणारे उपकरण तयार केले आहे. ते उपकरण फोनमध्ये बसवलं तर दुसऱ्याचं बोलणं सहज ऐकू येतं. तसंच त्याच्या आजूबाजूला किती लोक आहेत, कोण कोण आहेत आणि काय बोलत आहेत, त्यांची नावं, नंबर, पत्ते हे सगळं सहज अगदी काही मिनिटांत उपलब्ध होत असल्याचा या तरुणाचा दावा आहे.
क्या बात है! चालता चालता चार्ज करा तुमचा मोबाईल-लॅपटॉप; कसं ते पाहा VIDEO
या तरुणाने सागर पोलिसांच्या अधिकाऱ्यांना या उपकरणाचा डेमोही दाखवला आहे. हे उपकरण बनवणाऱ्या तरुणाचं म्हणणं आहे की, सध्या जीपीएस तंत्रज्ञानावर काम केलं जातं, मात्र भविष्याचा विचार करून त्यानी हे सॉफ्टवेअर आयपीएस तंत्रज्ञानावर विकसित केलं आहे. गुन्हेगारांना पकडण्यात हे उपकरण पोलीस आणि लष्करासाठी खूप प्रभावी ठरू शकतं, असा दावा या तरुणाने केला आहे.
सागरचे रहिवासी मुकेश कुमार यांनी सांगितलं की, होम थिएटरमध्ये सीपीयू कॅमेरा आणि इतर गोष्टी बसवण्यात आल्या आहेत. आयपी अॅड्रेसवर मोबाइलसारखे दुसरे उपकरण तयार केले आहे, जे त्याला जोडलेलं आहे. इंटरनेटद्वारे हे उपकरण चालू होताच, 100 मीटरच्या परिघात असलेल्या सर्व मोबाइल फोनचा डेटा त्यात अॅक्सेस होतो. यासाठी त्यांनी मेमरी कार्डही बसवले आहेत. एका मेमरी कार्डमध्ये 5-6 दिवसांपर्यंतचा रेकॉर्ड आरामात ठेवता येतो, ते बनवण्यासाठी 40 ते 50 हजार रुपये खर्च आला आहे.
डेमो पाहिल्यानंतर अधिकाऱ्यांनी त्याच्याकडून आणखी काही उत्तरेही मागवली आहेत. तरुणांच्या शोधाबाबत अतिरिक्त एसपी विक्रम सिंह कुशवाह सांगतात की, तरुणानी केलेला प्रयत्न चांगला आहे, मात्र यातील बहुतांश गोष्टी पोलिसांकडे आधीच आहेत. काही नवीन गोष्टीही सांगितल्या आहेत, ज्याबद्दलची उत्तरे प्रात्यक्षिक स्वरूपात मागवली आहेत, ती मिळाल्यानंतरच पुढे काही सांगता येईल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Local18, Technology