मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /32GB स्टोरेजसह 6500 रुपयांत Itel चा जबरदस्त बजेट Smartphone, स्क्रिन तुटल्यास फ्रीमध्ये मिळेल रिप्लेसमेंट

32GB स्टोरेजसह 6500 रुपयांत Itel चा जबरदस्त बजेट Smartphone, स्क्रिन तुटल्यास फ्रीमध्ये मिळेल रिप्लेसमेंट

 नवा बजेट स्मार्टफोन (Budget Smartphone) घेण्याचा विचार करत असाल, तर तुमच्यासाठी चांगली संधी आहे. Itel ने आपल्या ए-सीरिजमध्ये Itel A49 फोन लाँच केला आहे.

नवा बजेट स्मार्टफोन (Budget Smartphone) घेण्याचा विचार करत असाल, तर तुमच्यासाठी चांगली संधी आहे. Itel ने आपल्या ए-सीरिजमध्ये Itel A49 फोन लाँच केला आहे.

नवा बजेट स्मार्टफोन (Budget Smartphone) घेण्याचा विचार करत असाल, तर तुमच्यासाठी चांगली संधी आहे. Itel ने आपल्या ए-सीरिजमध्ये Itel A49 फोन लाँच केला आहे.

नवी दिल्ली, 15 मार्च : नवा बजेट स्मार्टफोन (Budget Smartphone) घेण्याचा विचार करत असाल, तर तुमच्यासाठी चांगली संधी आहे. एंट्री लेवल सेगमेंट आयटेलने (Itel) आपला लेटेस्ट स्मार्टफोन लाँच केला आहे. Itel ने आपल्या ए-सीरिजमध्ये Itel A49 फोन लाँच केला आहे. अतिशय बजेट किमतीत चांगल्या फीचर्ससह हा फोन नक्कीच फायदेशीर ठरू शकतो.

Itel A49 मध्ये डुअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. 4000 mAh ची चांगली बॅटरीही आहे. फोनमध्ये सिक्योरिटीसाठी फिंगरप्रिंट सेंसरही दिला गेला आहे. एंट्री लेवल सेगमेंटमध्ये हा फोन आकर्षक फीचर्ससह लाँच झाला आहे. हा फोन सिंगल रॅम आणि स्टोरेज कॉन्फिग्रेशनमध्ये येतो. हँडसेट तीन रंगात उपलब्ध आहे. या फोनला वॉटर ड्रॉप स्टाइल नॉच डिस्प्लेही देण्यात आला आहे.

डुअल सिम सपोर्ट असणारा Itel A49 स्मार्टफोन Android 11 Go Edition वर काम करतो. यात 6.6 इंची HD+ IPS डिस्प्ले देण्यात आला आहे. फोन 1.4 Ghz क्वाड कोर प्रोसेसरवर काम करतो. फोनला 2GB RAM + 32GB स्टोरेज देण्यात आलं आहे.

32GB सिंगल स्टोरेज ऑप्शन मायक्रो एसडी कार्डच्या मदतीने 128GB पर्यंत वाढवता येतं. फोनला 4G VoLTE, Wi-Fi, ब्लूटूथ, USB पोर्ट आहे. फेस अनलॉक आणि रियर फिंगरप्रिंट सेंसरसारखे फीचर्सही देण्यात आले आहेत.

हे वाचा - केवळ 1400 रुपयांत घरी आणता येईल AC, जबरदस्त फीचर्ससह पाहा काय आहे डील

कॅमेरा -

फोनला डुअल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. याची मेन लेन्स 5 मेगापिक्सलची आहे. त्याशिवाय फोनला दुसरा सेंसर QVGA देण्यात आला आहे, हा AI फीचरसह येतो. फोनला 5 मेगापिक्सल सेल्फी कॅमेराही आहे. फ्रंटसाठी कंपनीने AI ब्यूटी मोडसारखे फीचर्स दिले आहेत.

हे वाचा - स्मार्टफोनसाठी स्वस्तातली Tempered Glass वापरताय? चांगलीच महागात पडेल ही खरेदी!

काय आहे किंमत -

Itel चा हा फोन 6499 रुपयांत लाँच करण्यात आला आहे. ही किंमत फोनच्या सिंगल कॉन्फिग्रेशन 2GB RAM + 32GB वेरिएंटची आहे. हँडसेट तीन कलर ऑप्शनमध्ये येतो.

हा फोन सध्या कंपनीच्या वेबसाइटवरुन खरेदी करता येईल. लाँच ऑफरअंतर्गत वन - टाइम स्क्रिन रिप्लेसमेंट दिली जात आहे. पण ही ऑफर फोन खरेदी केल्यापासून 100 दिवसांपर्यंतच आहे.

First published:

Tags: Smartphone, Tech news