मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /

IT Rules 2021: फेसबुकने हटवल्या तब्बल 3 कोटी पोस्ट, 'या' Posts वर घेण्यात आली अ‍ॅक्शन

IT Rules 2021: फेसबुकने हटवल्या तब्बल 3 कोटी पोस्ट, 'या' Posts वर घेण्यात आली अ‍ॅक्शन

नवीन आयटी नियमांअंतर्गत 50 लाखांहून अधिक युजर असणाऱ्या सर्वात मोठ्या डिजिटल प्लॅटफॉर्म्सना आता दर महिन्याला कम्प्लायन्स रिपोर्ट प्रकाशित करावा लागणार आहे. ज्यामध्ये त्यांच्याकडे आलेल्या तक्रारींचा आणि त्यावर घेण्यात आलेल्या अ‍ॅक्शनचा उल्लेख करावा लागणार आहे.

पुढे वाचा ...
  • Published by:  Janhavi Bhatkar

नवी दिल्ली, 03 जुलै: सोशल मीडिया प्लॅटफॉर्म (Social Media) असणाऱ्या फेसबुकने (Facebook) देशभरातून 15 मे ते 15 जून दरम्यान 10 उल्लंघन श्रेणींच्या अंतर्गत येणाऱ्या एकूण 30 मिलियन अर्थात 3 कोटींपेक्षाही अधिक पोस्ट हटवल्या आहेत. या सोशल मीडियातील दिग्गज कंपनीने आयटी नियमांअंतर्गत पहिला मासिक अनुपालन अहवाल सादर केला, त्या अंतर्गत ही माहिती दिली आहे. शिवाय फेसबुकचा मालकी हक्क असणाऱ्या इन्स्टाग्रामने (Instagram) देखील याच कालावधीदरम्यान एकूण 9 श्रेणींअंतर्गत जवळपास 2 मिलियन पोस्टवर कारवाई केली आहे.

नवीन आयटी नियमांअंतर्गत 50 लाखांहून अधिक युजर असणाऱ्या सर्वात मोठ्या डिजिटल प्लॅटफॉर्म्सना आता दर महिन्याला कम्प्लायन्स रिपोर्ट प्रकाशित करावा लागणार आहे. ज्यामध्ये त्यांच्याकडे आलेल्या तक्रारींचा आणि त्यावर घेण्यात आलेल्या अ‍ॅक्शनचा उल्लेख करावा लागणार आहे.

15 जुलैला येणार अंतिम अहवाल

फेसबुकने अशी माहिती दिली आहे की पुढील अहवाल 15 जुलै रोजी प्रकाशित केला जाईल, ज्यामध्ये प्राप्त तक्रारी आणि त्यावर केलेल्या कारवाईचा उल्लेख असेल. या आठवड्याच्या सुरुवातीला फेबसबुकनं असं म्हटलं होतं की, 2 जुलै रोजी त्यांच्याकडून अंतरिम अहवाल सादर केला जाईल, ज्यामध्ये त्यांच्याकडून हटवण्यात आलेल्या कंटेटच्या संख्येबाबत तपशील देण्यात येईल. अंतिम अहवाल 15 जुलै रोजी सादर केला जाईल.

हे वाचा-WhatsApp वर Video पाठवणाऱ्यांसाठी खूशखबर! तुमच्यासाठी खास येतंय हे फीचर

फेसबुकने हटवला हा कंटेट

15 जुलैच्या अहवालात WhatsApp शी संबंधित डेटा देखील समाविष्ट असेल, हे App वर देखील फेसबुकचा मालकी हक्क आहे. अन्य प्रमुख प्लॅटफॉर्म ज्यांनी रिपोर्ट सादर केला आहे त्यामध्ये Google चा समावेश आहे. फेसबुकने त्यांच्या अहवालात असं म्हटलं आहे की, 15 मे ते 15 जून या दरम्यान 10 श्रेणींमधून 30 मिलियनपेक्षा अधिक कंटेटवर कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये स्पॅम (25 मिलियन), हिंसक आणि ग्राफिक (2.5 मिलियन), प्रौढ नग्नता आणि लैंगिक गतिविधींशी संबंधित कंटेट आहे. शिवाय गुंडगिरी आणि उत्पीडन, आत्महत्या, धोकादायक संस्था आणि व्यक्ती, दहशतवादी प्रचार इ. श्रेणीमध्ये येणाऱ्या सामग्रींवर (Content) कारवाई करण्यात आली आहे.

First published:

Tags: Facebook, Instagram, Instagram post