Home /News /technology /

Smartphone चा कॅमेरा तुमची हेरगिरी करतोय का? Google च्या खुलाशात मोठी बाब उघड, अशी घ्या काळजी

Smartphone चा कॅमेरा तुमची हेरगिरी करतोय का? Google च्या खुलाशात मोठी बाब उघड, अशी घ्या काळजी

स्मार्टफोनच्या कॅमेऱ्याने तुमच्यावर नजर तर ठेवली जात नाही ना? असे काही अ‍ॅप्स आहेत, जे तुमच्याच स्मार्टफोनचा कॅमेरा ॲक्सेस वापरून तुमची हेरगिरी करतात.

नवी दिल्ली, 8 नोव्हेंबर : बदलत्या काळानुसार स्मार्टफोनमध्ये ( smartphones) कॅमेऱ्यांची (cameras) संख्या वाढली आहे. अगदी सुरुवातीला स्मार्टफोनमध्ये एकच कॅमेरा होता. मात्र, हल्लीच्या स्मार्टफोनमध्ये किमान दोन किंवा त्यापेक्षा अधिक कॅमेरे असतात. पण याच स्मार्टफोनच्या कॅमेऱ्याने तुमच्यावर नजर तर ठेवली जात नाही ना? याचा कधी विचार केला आहे का? असे काही अ‍ॅप्स आहेत, जे तुमच्याच स्मार्टफोनचा कॅमेरा ॲक्सेस वापरून तुमची हेरगिरी करतात. गुगलने (Google) लाखो अँड्रॉइड युजर्सना (Android Users) खबरदारीचा इशारा दिला आहे की, काही अ‍ॅप्स लोकांची हेरगिरी करत आहेत. गुगलचं नवीन फीचर फोनचा मायक्रोफोन किंवा कॅमेरा अ‍ॅक्टिव्ह झाल्यानंतर युजर्सला याबाबत सावध करतं. अ‍ॅपलच्या आयफोनवर ही सुविधा आधीच आहे. कॅमेरा किंवा मायक्रोफोन अ‍ॅक्टिव्ह झाल्यावर गुगल आता युजर्सला सावध करत आहे. त्यामुळे तुम्ही विशेषत: हँडसेटवर कॅमेरा आणि मायक्रोफोन ॲक्सेस बंद करू शकता. लेटेस्ट अँड्रॉइड - 12 (Android 12) अपडेटमध्ये हे गुगल फीचर आहे. हे स्क्रीनच्या वरच्या उजव्या कोपऱ्यात दिसेल. जेव्हा अ‍ॅप ॲक्सेस करण्याचा प्रयत्न करेल, तेव्हा तुम्हाला कॅमेरा किंवा मायक्रोफोन आयकॉन दिसेल. हे अ‍ॅप्सला तुमच्या फोनच्या कॅमेऱ्याद्वारे तुमच्या परवानगीशिवाय ऐकण्यापासून तसंच पाहण्यापासून रोखू शकेल.

Google Photos: सुरक्षित ठेवता येतील तुमचे फोटो-व्हिडीओ, नव्या फीचरद्वारे करा लॉक

App कडून असा होता कॅमेराचा वापर? एखादं अ‍ॅप वापरण्यासाठी कॅमेऱ्याची आवश्यकता नसतानाही संबंधित अ‍ॅपसाठी कॅमेऱ्याचा ॲक्सेस मागितला जात असेल तर सावध व्हा. कारण गरज नसताना अ‍ॅप कॅमेऱ्याचा ॲक्सेस घेत असेल तर, याचा अर्थ असा होऊ शकतो की तुमची हेरगिरी केली जात आहे. सायबर तज्ज्ञांनी अँड्रॉइड फोनवरील कॅमेरा गरज नसताना ॲक्सेस करणाऱ्या असंख्य अ‍ॅप्सचा पर्दाफाश केला आहे. त्यामुळे तुम्ही Android 12 अपडेट वापरत असल्याची खात्री करा. तुम्हाला तुमच्या स्मार्टफोनमध्ये काहीतरी गडबड झाल्याचा जरी संशय आला, तर तुम्ही सेटिंग्जमध्ये अ‍ॅपच्या परमिशन तपासा. तुम्‍ही वापरत नसलेल्या अ‍ॅपला ॲक्सेस मिळाला असेल तर ते तात्काळ बंद करा. कोणत्या अ‍ॅप्सना तुमचा कॅमेरा, मायक्रोफोन किंवा लोकेशनची केव्हा आवश्यकता आहे, याचा रोलिंग लॉगदेखील तुम्ही पाहू शकता. ती माहिती सेटिंग्जमधील नवीन प्रायव्हसी डॅशबोर्डमध्ये देण्यात आली आहे. आता तुमच्या क्विक सेटिंग्जमध्ये तुमचा मायक्रोफोन आणि कॅमेरा स्मार्टफोनवर पूर्णपणे निष्क्रिय करणंदेखील शक्य आहे. अर्थात कॅमेरा आयकॉन पाहण्याचा अर्थ असा होत नाही की, प्रत्येकवेळी तुमची हेरगिरी केली जात आहे. कधीकधी अ‍ॅपला खरोखर तुमचा कॅमेरा वापरण्याची आवश्यकता असते. यामध्ये इन्स्टाग्रामसारख्या अ‍ॅपचा समावेश होतो.

तुम्हीही Toilet मध्ये Smartphone घेवून जाता का? मग याचे गंभीर परिणाम एकदा वाचाच

सध्या मल्टिपल कॅमेरा असलेल्या स्मार्टफोनचा ट्रेंड सुरू असल्याचं दिसून येतं. मल्टिपल कॅमेऱ्यांमध्ये दोन किंवा अधिक कॅमेऱ्यांचा समावेश होतो. एकापेक्षा अधिक कॅमेरे असल्याने फोटोचाही दर्जा निश्चितच सुधारला आहे. पण याच कॅमेऱ्यामुळे तुमची हेरगिरी तर होत नाही ना, याची वेळोवेळी काळजी घेण्याची गरज आहे.
First published:

Tags: Smartphone, Tech news

पुढील बातम्या