फोनची बॅटरी लवकर डिस्चार्ज होतेय? जाणून घ्या काही टीप्स

फोनची बॅटरी लवकर डिस्चार्ज होतेय? जाणून घ्या काही टीप्स

सततच्या वापरामुळे बॅटरी लवकर उतरत असेल तर यासाठीच्या काही टीप्स नक्कीच फायदेशीर ठरु शकतात. यामुळे फोनची बॅटरी लाईफ वाढण्यास मदत होऊ शकते.

  • Share this:

मुंबई, 2 ऑक्टोबर : स्मार्टफोन जवळपास सर्वांच्याच आयुष्याचा महत्त्वाचा भाग बनला आहे. इंटरटेनमेंट, कम्युनिकेशन, इन्फॉर्मेशन आणि इतरही अनेक गोष्टींसाठी स्मार्टफोन महत्त्वाचा ठरतो आहे. अनेक जण दररोजच्या कामांसाठीही या छोट्याशा डिव्हाईसवर अवलंबून आहेत. या सगळ्याच गोष्टींसाठी मोबाईल चार्ज असणं महत्त्वाचं आहे.

ब्राऊझिंग, नेव्हिगेशन, मीडिया प्लेबॅक यामुळे बॅटरी लवकर डिस्चार्ज होण्याची समस्या येऊ लागते. सततच्या वापरामुळे बॅटरी लवकर उतरत असेल तर यासाठीच्या काही टीप्स नक्कीच फायदेशीर ठरु शकतात. यामुळे फोनची बॅटरी लाईफ वाढण्यास मदत होऊ शकते.

लोकेशन सर्व्हिसेज आणि ब्लूटूथ

जीपीएस फीचर बॅटरीला लवकर डिस्चार्ज करतं. जीपीएस ऑन राहिल्यामुळे बॅटरी लवकर उतरते, त्यामुळे हे फीचर वापरात नसल्यास ते टर्न ऑफ करा. जीपीएसशिवाय ब्लूटूथमुळेही बॅटरी लवकर डिस्चार्ज होते. त्यामुळे याचाही वापर नसल्यास ते टर्न ऑफ करणं आवश्यक आहे.

डिस्प्ले ब्राइटनेस

डिस्प्ले ब्राइटनेसची लेवल जास्त असल्यास बॅटरी लवकर डिस्चार्ज होते. त्यामुळे गरज नसल्यास ब्राइटनेस कमी ठेवा. ब्राइटनेस सतत कमी-जास्त करायचा नसल्यास तो ऑटो सेव्ह करा.

हे वाचा - विना इंटरनेट असं वापरा गूगल मॅप; ऑफलाईन GPS वापरण्याची सोपी ट्रिक

बॅकग्राऊंड ऍप्स

बॅकग्राऊंड ऍप्स फोनच्या प्रोसेसरला भरलेलं ठेवतात, त्यामुळे डिव्हाईसची बॅटरी लवकर डिस्चार्ज होते. प्रोसेसरचा वापर कमी करण्यासाठी आणि बॅटरी सेव्ह करण्यासाठी बॅकग्राऊंड ऍप्स बंद करा.

Always-On display फीचर

ऑलवेज ऑन डिस्प्ले फीचरमध्ये डिस्प्ले सतत ऑन राहत असल्याने बॅटरी लवकर डिस्चार्ज होते. त्यामुळे हे फीचर ऑफ ठेवणं बॅटरीसाठी फायद्याचं ठरतं.

हे वाचा - मोबाईल बँकिंगचा वापर करत असल्यास सावधान; देशात सायबर फ्रॉडच्या संख्येत वाढ

लाईव्ह वॉलपेपर

लाईव्ह वॉलपेपरचा वापर होत असल्यास, डिस्प्ले हायर फ्रिक्वेंसीवर अपडेट राहतो. त्यामुळे बॅटरी लवकर डिस्चार्ज होते. त्यामुळे फोनची बॅटरी अधिक काळ टिकवण्यासाठी लाईव्ह वॉलपेपरचा वापर टाळणं

फायद्याचं आहे.

हे वाचा - आता दुसऱ्याचं WhatsApp स्टेटस डाऊनलोड करता येणार

Published by: Karishma Bhurke
First published: October 2, 2020, 6:48 PM IST

ताज्या बातम्या