मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /

Apple देणार Free Repairing ची सुविधा, तुमच्या iPhone मध्ये येते का 'ही' समस्या?

Apple देणार Free Repairing ची सुविधा, तुमच्या iPhone मध्ये येते का 'ही' समस्या?

Apple ने iPhone 12, iPhone 12 Pro मध्ये येत असलेल्या Sound Problem ला विचारात घेता एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

Apple ने iPhone 12, iPhone 12 Pro मध्ये येत असलेल्या Sound Problem ला विचारात घेता एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

Apple ने iPhone 12, iPhone 12 Pro मध्ये येत असलेल्या Sound Problem ला विचारात घेता एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

  • Published by:  Atik Shaikh

नवी दिल्ली, 27 नोव्हेंबर : iPhone युजर्ससाठी Apple कंपनी विविध फीचर्स आणत असते. iPhone घेतल्यानंतर अनेकदा त्यात वेगवेगळ्या समस्या येतात. त्याची वेळीच दुरूस्ती करावी लागते. त्यामुळे आता Apple ने iPhone 12, iPhone 12 Pro मध्ये येत असलेल्या Sound Problem ला विचारात घेता एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

आता iPhone 12 आणि iPhone 12 Pro या दोन आयफोनपैकी कोणत्याही आयफोनमध्ये कोणतीही तांत्रिक अडचण (iphone Sound Problem) निर्माण झाली, तर त्याची रिपेयरिंग Apple कंपनीकडून मोफत केली जाणार आहे. त्यामुळे आता या निर्णयाचा आयफोन युजर्सला फायदा होणार आहे.

Koo अ‍ॅपवर Yellow Tick साठी युजर्सला करता येणार Apply; पाहा काय आहे प्रोसेस

Apple करणार Free Repairing?

Apple कंपनीने दिलेल्या माहितीनुसार iPhone 12 आणि iPhone 12 Pro या दोन स्मार्टफोनसाठी ही ऑफर असणार आहे. त्यासाठी वरील iPhone हे दोन वर्षांहून अधिक जुने असू नये आणि त्यात Sound Problem असायला हवा, अशा अटी ठेवण्यात आल्या आहे. रिपेयरिंगसाठी युजर्सला Apple च्या कोणत्याही Service Center वर मोफत रिपेयरिंग मिळेल. त्यामुळे युजर्सने आयफोन रिपेयरिंगला देताना त्यातला Data Backup करून घ्यायला हवा.

Moto G200 : स्नॅपड्रॅगन 888+ प्रोसेसर असलेला मोटोरोलाचा एक नवा स्मार्टफोन

कशामुळे येते ही समस्या?

काही iPhone 12 आणि iPhone 12 Pro च्या युनिटमध्ये रिसीवर मॉड्यूल फेल झाल्यामुळे आयफोनच्या साउंडमध्ये समस्या निर्माण होत आहे. जर तुमच्याही आयफोनची स्क्रिन डॅमेज (back of iphone cracked repair) झालेली असेल तर त्यासाठी Apple च्या Service Center मध्ये संपर्क साधायला हवा.

'ही' सात ॲप्स तुमच्या फोनसाठी ठरु शकतात घातक, गुगलनंही केली कारवाई

असं चेक करा आयफोनचं Warranty Status -

काही आयफोन युजर्सला दुरूस्तीसाठी चार्ज द्यावा लागणार आहे. हा चार्ज वाचवण्यासाठी युजर्सला त्याच्या आयफोनची Device Manufacturing Guarantee चेक करावी लागणार आहे. त्याद्वारे युजर्सला आयफोनचा Product Serial Number मिळेल. त्यानंतर सेटिंगमध्ये जाऊन जनरल ऑप्शनवर क्लिक करा.

तुमचा Apple iPhone ओरिजनल की बनावट, ओळखा अशा प्रकारे

त्यानंतर About च्या पर्यायावर क्लिक केल्यानंतर checkcoverage.apple.com वर जाऊन फॉर्म भरावा लागणार आहे. संबंधित फॉर्ममध्ये सिरियल नंबर आणि स्पेशल कोड टाकल्यानंतर आयफोनचा वारंटी स्टेटस पाहता येईल.

First published:

Tags: Apple, Iphone