मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /Wifi च्या स्लो स्पीडची समस्या येतेय? या टिप्स ठरतील फायदेशीर

Wifi च्या स्लो स्पीडची समस्या येतेय? या टिप्स ठरतील फायदेशीर

वायफायचा कमी झालेला स्पीड नीट करण्यासाठी अनेक पर्याय आहेत. त्यासाठी कोणतेही पैसे भरावे लागत नाहीत. वायफायचा स्पीड कमी असल्यास, तो वाढवण्यासाठी काही गोष्टी करता येतील.

वायफायचा कमी झालेला स्पीड नीट करण्यासाठी अनेक पर्याय आहेत. त्यासाठी कोणतेही पैसे भरावे लागत नाहीत. वायफायचा स्पीड कमी असल्यास, तो वाढवण्यासाठी काही गोष्टी करता येतील.

वायफायचा कमी झालेला स्पीड नीट करण्यासाठी अनेक पर्याय आहेत. त्यासाठी कोणतेही पैसे भरावे लागत नाहीत. वायफायचा स्पीड कमी असल्यास, तो वाढवण्यासाठी काही गोष्टी करता येतील.

नवी दिल्ली, 8 जानेवारी : सध्या इन्स्टंट कनेक्शनवर सर्वजण निर्भर असताना स्लो वायफायमुळे अनेकदा समस्या येतात. अनेक जण वर्क फ्रॉम होम असल्याने वायफायचा (Wifi) वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. ज्यावेळी फास्ट इंटरनेटची गरज असते, त्याचवेळी वायफाय स्पीड कमी होतो. परंतु वायफायचा कमी झालेला स्पीड नीट करण्यासाठी अनेक पर्याय आहेत. त्यासाठी कोणतेही पैसे भरावे लागत नाहीत. वायफायचा स्पीड कमी असल्यास, तो वाढवण्यासाठी काही गोष्टी करता येतील.

- आपल्याला जशी आरामाची गरज असते, त्याचप्रमाणे इलेक्ट्रॉनिक वस्तूंनाही आरामाची गरज असते. त्यामुळे राउटर काही वेळ बंद करा. वायफाय मॉडेम घरातील नेटवर्क आणि आयएसपी दरम्यान इंटरनेट सिग्नल्सला ट्रान्सलेट करतो. इंटरनेट स्लो झाल्यास, एकदा मॉडेम रिस्टार्ट करा.

- अनेकदा राउटरच्या जागेमुळेही वायफायमध्ये समस्या येऊ शकते. जर वायफाय सिग्नल्समध्ये भिंत, फर्निचर किंवा इतर काही वस्तू आल्यास इंटरनेट स्पीडमध्ये समस्या येते. इंटरनेट स्पीड रेडिओ वेव्समुळेही स्लो होतो. जर राउटर घराच्या कोपऱ्यात असल्यास, त्याला खुल्या जागी शिफ्ट केल्यास, स्लो इंटरनेटची समस्या कमी होऊ शकते.

(वाचा - customer care scam : फोनमध्ये हे 7 App डाउनलोड करू नका; खाली होऊ शकतं बँक अकाउंट)

- अनेक राउटर्समध्ये इंटरनल एँटिना असतो. इंटरनल एँटिना म्हणजे याला अ‍ॅडजस्ट करता येत नाही. पण एँटिना अ‍ॅडजस्टेबल असल्यास, त्याला अ‍ॅडजस्ट करू शकता. एँटिना अ‍ॅडजस्ट केल्याने, वायफाय सिग्नल चांगला होण्याची शक्यता वाढते. उदा. वर्टिकल एँटिना, सिग्नल्स हॉरिजॉन्टलीच पाठवतो. त्यामुळे वायफाय संपूर्ण घरात पसरेल अशारितीने एँटिना अ‍ॅडजस्ट करता येऊ शकतो.

(वाचा - WhatsApp Pay वर सायबर फ्रॉडपासून सावधान; पेमेंट करताना या 5 गोष्टी लक्षात ठेवाच)

- युजर्सनी वायफाय फ्रिक्वेंसी चॅनेलही चेक करावं. त्याला बदलताही येऊ शकतं. प्रत्येक फ्रिक्वेंसी बँडमध्ये वेगवेगळे चॅनल्स असतात. त्यापैकी कोणताही वापरता येतो. वायफायसाठी चांगल्या चॅनलची निवड करण्यासाठी राउटरच्या ऑनलाईन इंटरफेसवर जावं लागेल. त्यावर राउटरचा आयपी अ‍ॅड्रेस टाकावा लागेल. त्यानंतर लॉगइन करुन, सेटिंग्समधून बँड चॅनल बदलता येईल.

- सेटिंग्समध्ये बदल करुनही वायफायमध्ये समस्या येत असल्यास, इंटरनेट प्लॅन अपग्रेड करावा लागेल.

First published:

Tags: Internet