NASA मध्ये कम्प्युटर प्रोग्रॅमिंगसाठी संस्कृत भाषा वापरली जाते? जाणून घ्या काय आहे सत्य

NASA मध्ये कम्प्युटर प्रोग्रॅमिंगसाठी संस्कृत भाषा वापरली जाते? जाणून घ्या काय आहे सत्य

कम्प्युटरसाठी संस्कृत भाषा ही सर्वोत्कृष्ट आहे, अशी चर्चा सोशल मीडियावर सगळीकडे आहे. पण सोशल मीडियावरील एकाही दाव्यात कम्प्युटर प्रोग्रॅमिंगसाठी संस्कृत भाषा कशा पद्धतीने वापरली जाऊ शकते याचा कुठेही उल्लेख नाही.

  • Share this:

नवी दिल्ली, 10 नोव्हेंबर : कम्प्युटरसाठी संस्कृत भाषा ही सर्वोत्कृष्ट आहे, अशी मोठी चर्चा सध्या सोशल मीडियावर सगळीकडे आहे. या बातमीसोबत नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस अडमिनिस्ट्रेशनचं (NASA) देखील नाव जोडलं जात आहे. सोशल मीडियावरील एकाही दाव्यात कम्प्युटर प्रोग्रॅमिंगसाठी संस्कृत भाषा (Sanskrit language) कशा पद्धतीने वापरली जाऊ शकते याचा कुठेही उल्लेख नाही. जाणून घ्या कम्प्युटरसाठी संस्कृत ही खरोखर चांगली भाषा आहे की नाही.

या दाव्याची सुरुवात कुठून झाली -

ही बातमी समजून घेण्यासाठी इतिहासात जावं लागेल. 1985 मध्ये नासाच्या संशोधक, रिक ब्रिग्स यांनी एक शोधनिबंध लिहिला होता. जो विज्ञानसंबंधी मासिक AI मध्ये प्रकाशित झाला होता. यामध्ये रिक यांनी नॉलेज रिप्रेझेंटेशन इन संस्कृत अँड आर्टिर्फिशियल लँग्वेज या शीर्षकाच्या लेखात अनेक मुद्दे लिहिले होते, जे कम्प्युटरसोबत बोलण्यासाठी प्राकृतिक भाषेच्या वापराबद्दल होते. प्राचीन भाषांपैकी एक आणि लिपीबाबत खूप समृद्ध असल्यामुळे संस्कृत भाषेचा उल्लेख इथे झाला.

संस्कृतबद्दल काय म्हणाले -

रिक शोधनिबंधात यांनी लिहिलं आहे की, लोकांचा असा विश्वास आहे की प्राकृतिक भाषा ट्रान्समिशनसाठी योग्य नाहीत आणि आर्टिफिशियल लँग्वेज कम्प्युटर कमांडसाठी अधिक योग्य आहेत. परंतु, असं नाही. संस्कृत ही एक भाषा आहे, जी 1000 वर्षांपासून जिवंत आहे आणि ज्यात मोठ्या प्रमाणात साहित्यदेखील उपलब्ध आहे. प्राकृतिक भाषा या आर्टिफिशियल लँग्वेजच्या जागी कशा आणल्या जाऊ शकतात हे ही त्यांनी पुढे सांगितलं आहे.

प्रचारातील दिशाभूल

हा शोधनिबंध 1985 साली लिहिला गेला होता. त्या वेळी, मानवी भाषांमध्ये इनपुट घेऊन उत्तर देणाऱ्या सर्च इंजिन्सचादेखील शोध लागला नव्हता. तसंच एआयवर चालणारे रोबोही तयार झाले नव्हते. अशा परिस्थितीत, संशोधकाने लेखात त्याचा अंदाज व्यक्त केला होता. त्याचवेळी त्यांनी नमूद केलं होतं की 'किमान' संस्कृत अशी भाषा आहे जी आर्टिफिशियल लँग्वेजचं स्थान घेऊ शकणारी आहे, ही 'एकच' भाषा आहे असं त्यांनी म्हटलं नव्हतं. पण रिक यांच्या पेपरचा हवाला देऊन संस्कृत ही एकमेव भाषा आहे जी कॉम्प्युटर प्रोग्रॅमिंगसाठी वापरली जाऊ शकते असा अपप्रचार सोशल मीडियावर करून दिशाभूल केली जात आहे.

प्राकृतिक आणि आर्टिफिशियल लँग्वेजमध्ये काय फरक आहे?

मनुष्य आणि कम्प्युटर दोन्ही वेगवेगळ्या भाषा समजतात. इंग्रजी, हिंदी किंवा संस्कृत यासारख्या प्राकृतिक भाषा आपण समजतो आणि बोलतो. त्याच वेळी, आर्टिफिशियल लँग्वेज, ज्याला मशीन लँग्वेज देखील म्हटलं जातं याचा उपयोग कम्प्युटर किंवा मशीनशी संवाद करण्यासाठी केला जातो. मशीनची भाषा बायनरी कोडमध्ये लिहिलेली असते ज्यामध्ये फक्त 0 आणि 1 हे दोन अंक वापरतात. कम्प्युटरच्या सर्किटने बायनरी कोड ओळखला की मग त्याला कमांड कळते.

(वाचा - Gold Price: सोन्याच्या किंमतीत मागील 7 वर्षातील सर्वात मोठी घसरण; हे आहे कारण)

नासानेसुद्धा शिक्कामोर्तब केलेलं नाही -

नासाने अधिकृत किंवा अनधिकृतपणे संस्कृतच्या प्रोग्रॅमिंगमधील वापराबद्दल कोणताही दावा केलेला नाही. युरेशियन टाईम्सच्या एका रिपोर्टमध्ये ही माहिती दिली आहे. जर नासाला 90 च्या दशकाच्या सुरूवातीलाच याबद्दल माहीत होतं तर आतापर्यंत संस्कृतचा वापर करून एक तरी एआय तयार झाला असता. सरळ शब्दांत सांगायचं झालं तर, असं मानलं जाऊ शकतं की सोशल मीडियावर नासाच्या नावावर केलेले हे दावे पूर्णपणे खोटे आहेत.

भाजप नेते काय म्हणाले -

केंद्रातील ज्येष्ठ भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी अनेकदा संस्कृतचं वर्णन उत्कृष्ट भाषा म्हणून केलं आहे. यावर्षी मार्चमध्ये त्यांनी एक ट्विटही केलं होतं, ते व्हायरलही झालं होतं. ट्विटमध्ये ते म्हणाले की, आपण इंग्रजी ही आंतरराष्ट्रीय भाषा म्हणून वारतोय हा वापर तात्पुरता आहे. लॅपटॉप जसे भारतीय नाहीत तशीच इंग्रजी भारतीय नाही, पण आपण परदेशी तंत्रज्ञान वापरून भारतीय लॅपटॉप तयार करण्याआधीच इंग्रजीला बाजूला करून पुढील 50 वर्षांत संस्कृत ही जागतिक भाषा होईल.

(वाचा - PF खात्यातून पैसे काढण्यापूर्वी जाणून घ्या हे नियम; अन्यथा भरावा लागेल टॅक्स)

भारतात संस्कृतची काय अवस्था आहे?

सध्या संस्कृतची स्थिती भारतात चांगली नाही. ही लुप्त होणाऱ्या भाषांपैकी एक आहे, ही भाषा बोलणारे केवळ 14135 लोक भारतात आहेत. परंतु, अजूनही संस्कृत ही अधिकृत भारतीय भाषांपैकी एक आहे. अनेक शतकं जुनी असणाऱ्या या भाषेचं पहिलं प्रमाण उत्तर प्रदेशातील अयोध्यात मिळालं असं मानलं जातं. प्राचीन संस्कृतचे अनेक पुरावे गुजरातमध्येही सापडले आहेत.

का मानली जाते, ही वैज्ञानिक भाषा

संस्कृत ही फार काळापासून वैज्ञानिक भाषा मानली जात आहे. याचं कारण त्याच्या व्याकरण ध्वनीवर आधारित आहे. त्यात (शब्दाच्या) आकारापेक्षा जास्त ध्वनीला महत्त्व आहे आणि प्रत्येक आकारासाठी एकच ध्वनी आहे. हेच या भाषेला अधिक वैज्ञानिक आणि सोपेदेखील बनवतं. क्लेफ्ट पॅलेटचा आजार असलेल्या व्यक्तीच्या जीभेने नीट उच्चार व्हावेत यासाठी संस्कृत बोलणं खूप उपयोगी ठरतं.

Published by: Karishma Bhurke
First published: November 10, 2020, 3:41 PM IST
Tags: technology

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading