नवी दिल्ली, 29 सप्टेंबर : स्मार्टफोन जवळपास प्रत्येकासाठी अतिशय महत्त्वाची गोष्ट असून अनेक कामं एका क्लिकवर फोनवरुन केली जातात. स्मार्टफोनमधलं जीपीएस सिस्टम (GPS System) लोकेशन दाखवण्यासाठी मदत करतं, आता याच GPS मध्ये वापरल्या जाणाऱ्या स्मार्टफोन सेंसर्सद्वारे Cannabis चं सेवन करुन एखादी व्यक्ती नशेत आहे की नाही हे ठरवण्यासाठीही मदत होऊ शकते.
Rutgers इन्स्टिट्यूट फॉर हेल्थ, हेल्थ केयर पॉलिसी आणि एजिंग रिसर्चच्या एका अभ्यासात ही बाब समोर आली आहे. जर्नल ड्रग अँड अल्कोहल डिपेंडेंसमध्ये प्रकाशित केलेल्या अध्ययनात स्मार्टफोन सेंसर्सचा वापर करुन मादक पदार्थांच्या व्यसनाच्या ओळखीचं मूल्यांकन केलं गेलं. यात स्मार्टफोन सेंसर डेटा 90 टक्के अचूक असल्याचं आढळलं.
संबंधित लेखक टॅमी चुंग, मानसोपचारशास्त्राचे प्राध्यापक आणि रुटगर्स इन्स्टिट्यूट फॉर हेल्थ, हेल्थ केयर पॉलिसी आणि एजिंग रिसर्चमधील सेंटर फॉर पॉप्युलेशन बिहेवियरल हेल्थचे संचालक यांनी सांगितलं, की एखाद्या व्यक्तीच्या फोनमध्ये सेंसरचा वापर करुन याची माहिती मिळवू शकतो, की कोणता व्यक्ती कधी ड्रग्सचा वापर करत आहे आणि आपण त्याला शोधण्यात सक्षम होऊ शकतो. ड्रग्सशी संबंधित हानी कुठे कमी करावी यासाठी हस्तक्षेप करु शकतो.
Cannabis मादक पदार्थाची नशा मंद प्रक्रियेच्या वेळेशी संबंधित आहे, जी कामावर परिणाम करते. तसंच ड्रायव्हिंगवेळीही याचा परिणाम होऊ शकतो, यामुळे अपघात होऊन जखमी होणं किंवा मृत्यू होण्याच्या घटना घडू शकतात.
ड्रग अँड अल्कोहल डिपेंडेंस जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासासाठी संशोधकांनी अशा तरुण तसंच वयस्कर लोकांकडून गोळा केलेल्या दररोजच्या डेटाचं विश्लेषण केलं, ज्यांनी आठवड्यातून किमान दोन वेळा या मादक पदार्थाचं सेवन केलं होतं.
मादक पदार्थांच्या नशेबाबत ओळख करण्यासाठी त्यांनी केलेल्या विश्लेषणात वापर झालेल्या स्मार्टफोन सेंसरद्वारे 90 टक्के अचूकता असल्याचं सांगण्यात आलं आहे. स्मार्टफोनच्या या खास सेंसरने शरीरातील नशेबाबत अचूक सांगितलं असल्याचं समोर आलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Smartphone, Tech news