नवी दिल्ली, 10 सप्टेंबर : भारतात अनेक प्रमुख इंटरनेट सर्विस प्रोव्हाईडर युजर्सला राउटरही (Router) देतात. फ्री राउटर आणि चांगली सुविधा देण्याच्या नावाखाली असं केलं जातं. अनेक टेलिकॉम कंपन्या युजर्सला तोपर्यंत फायबर कनेक्शन देण्याची परवानगी देत नाहीत, जोपर्यंत ते मोफत राउटर घेण्यासाठी सहमती देत नाहीत. परंतु फ्री राउटर मिळत असल्याच्या नादात अधिकतर युजर्स इंटरनेट कनेक्शनसह फ्री राउटरची ही ऑफर नाकारत नाही. पण हे असं करणं कितपत योग्य आहे?
अधिकतर युजर्स राउटर फ्री मिळत असल्याने याकडे लक्ष देत नाहीत. परंतु काही युजर्स आपली गोपनीयता लक्षात घेता याबाबत जागरुक असतात.
राउटरची मालकी आणि व्यवस्थापन इंटरनेट प्रोव्हाईडरद्वारे केलं जातं, जे या राउटरसह अंतर्गत सॉफ्टवेअरचा पुरवठा आणि व्यवस्थापन करतात. या कंपन्या राउटरच्या मार्गातून जाणाऱ्या सर्व इंटरनेट ट्रॅफिकवर नजर ठेवू शकतात.
टेलिकॉम कंपन्या फायबर कनेक्शन युजर्सला केवळ राउटरचं पुरवत नाहीत, तर मोठी समस्या म्हणजे ते या राउटरला आपल्या होम नेटवर्कमध्ये टाकण्याचा आग्रह करतात. जर एखाद्या युजरला स्वत:चं राउटर खरेदी करायचं असेल आणि ते वापरायचं असेल, तर मोठ्या टेलिकॉम कंपन्या अनेकदा कनेक्शन देण्यास नकार देतात.
एअरटेल, एसीटी आणि इतर इंटरनेट प्रोव्हाईडर घरात फायबर कनेक्शन देतात, त्यावेळी ते युजरला कंपनीद्वारा देण्यात येणारं राउटर लावण्याचं सांगतात. त्यामुळे युजरची प्रायव्हसी धोक्यात येण्याची शक्यता निर्माण होऊ शकते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.