मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /तुमच्या नावावर दुसरं कोणी सिमकार्ड वापरतंय का? असं ओळखा

तुमच्या नावावर दुसरं कोणी सिमकार्ड वापरतंय का? असं ओळखा

दुसऱ्या व्यक्तींची कागदपत्रं वापरून अवैध रीतीने मोबाईल सिम कार्डस् घेण्याच्या तक्रारी वाढत चालल्या आहेत. म्हणूनच दूरसंचार विभागाने एक टूल लाँच केलं आहे. या टूलचा वापर करून लोकांना आपण वापरत नसलेल्या, पण आपल्या नावावर असलेल्या सिम कार्ड्सची माहिती मिळेल.

दुसऱ्या व्यक्तींची कागदपत्रं वापरून अवैध रीतीने मोबाईल सिम कार्डस् घेण्याच्या तक्रारी वाढत चालल्या आहेत. म्हणूनच दूरसंचार विभागाने एक टूल लाँच केलं आहे. या टूलचा वापर करून लोकांना आपण वापरत नसलेल्या, पण आपल्या नावावर असलेल्या सिम कार्ड्सची माहिती मिळेल.

दुसऱ्या व्यक्तींची कागदपत्रं वापरून अवैध रीतीने मोबाईल सिम कार्डस् घेण्याच्या तक्रारी वाढत चालल्या आहेत. म्हणूनच दूरसंचार विभागाने एक टूल लाँच केलं आहे. या टूलचा वापर करून लोकांना आपण वापरत नसलेल्या, पण आपल्या नावावर असलेल्या सिम कार्ड्सची माहिती मिळेल.

पुढे वाचा ...

    नवी दिल्ली, 10 मे: मोबाईल (Mobile) ही आजच्या काळातली जीवनावश्यक वस्तू झाली आहे, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. कारण आपल्या आधार कार्डपासून अनेक प्रकारच्या सरकारी सेवांपर्यंत आणि बँकांपासून अन्य महत्त्वाच्या संस्थांपर्यंत अनेक ठिकाणी आपला मोबाइल नंबर जोडलेला असतो. त्यात आता मोबाइल सिम कार्ड घेणं एकदम सहज-सोपं आणि स्वस्त झाल्यामुळे अनेक जण एकापेक्षा जास्त कार्ड्स वेगवेगळ्या उपयोगासाठी घेत असतात, पण एका व्यक्तीच्या नावावर जास्तीत जास्त किती कार्डस् असणं वैध आहे, याची कल्पना आहे का?

    एका व्यक्तीच्या नावावर जास्तीत जास्त नऊ मोबाईल नंबर अॅक्टिव्हेट होऊ शकतात. काही वेळा आपल्या नावावर किती नंबर चालू आहेत, हे त्या व्यक्तीलाच माहिती नसतं. कारण कुटुंबातल्या एका व्यक्तीच्या नावावर सिम कार्ड घेऊन त्या कुटुंबातल्या अन्य व्यक्ती ते कार्ड वापरत असू शकतात. तसंच, काही वेळा कागदपत्रांचा गैरवापर करूनही सिमकार्ड घेतलं गेलं असल्याची शक्यता नाकारता येत नाही.

    पूर्वी मोबाईल ऑपरेटरच्या (Mobile Operator) ऑफिसमध्ये गेलं, की आपल्या नावावर किती कार्ड्स आहेत, याची माहिती सहज मिळायची. आता नंबर पोर्टेबिलिटीचा पर्याय, तसंच वाढलेल्या ग्राहक संख्येमुळे ही माहिती सहजासहजी मिळत नाही. म्हणूनच आपल्या नावावर किती मोबाईल नंबर्स अॅक्टिव्हेटेड आहेत, याची माहिती देणारं एक पोर्टल सुरू करण्यात आलं आहे.

    (वाचा - Online न दिसताच करता येणार चॅटिंग; पाहा WhatsApp ची ही कमाल ट्रिक)

    'डिजिट डॉट इन'ने दिलेल्या माहितीनुसाप, tafcop.dgtelecom.gov.in अशी त्या पोर्टलची लिंक आहे. या पोर्टलवर (Portal) जाऊन आपला मोबाईल नंबर टाकला, की ओटीपी येतो आणि व्हेरिफिकेशन झाल्यानंतर आपल्याला आपल्या नावावर नेमकी किती सिमकार्ड्स आहेत, याची माहिती मिळते. डिपार्टमेंट ऑफ टेलिकम्युनिकेशन (Department of Telecommunication) अर्थात सरकारच्या दूरसंचार विभागानेच हे पोर्टल सुरू केलं आहे. सध्या तरी हे पोर्टल केवळ आंध्र प्रदेश, तेलंगणा या राज्यां पुरतंच सुरू करण्यात आलं आहे. म्हणजे या राज्यांत सेवा पुरवणाऱ्या नोंदणीकृत ऑपरेटर्सच्या ग्राहकांनाच या पोर्टलवरून माहिती मिळू शकते, मात्र लवकरच संपूर्ण देशभरात हे पोर्टल सुरू केलं जाणार आहे.

    दूरसंचार विभागाचे उप-महाव्यवस्थापक ए. रॉबर्ट रवी यांनी सांगितलं, 'दुसऱ्या व्यक्तींची कागदपत्रं वापरून अवैध रीतीने मोबाईल सिम कार्डस् घेण्याच्या तक्रारी वाढत चालल्या आहेत. म्हणूनच दूरसंचार विभागाने हे टूल लाँच केलं आहे. या टूलचा वापर करून लोकांना आपण वापरत नसलेल्या, पण आपल्या नावावर असलेल्या सिम कार्ड्सची माहिती मिळेल. आवश्यक नसलेली सिमकार्डस् (SIM Cards) ब्लॉक करता येऊ शकतात.'

    (वाचा - PAN Card घरबसल्या करा अपडेट, जाणून घ्या संपूर्ण प्रोसेस)

    एका व्यक्तीच्या नावावर जास्तीत जास्त नऊ मोबाइल नंबर असणं वैध आहे. प्रत्यक्षात मात्र ही संख्या यापेक्षा अधिक असल्याचं दिसतं. म्हणूनच या पोर्टलद्वारे अवैध नंबर बंद करण्यास मदत होऊ शकेल.

    जे नंबर आपल्या नावावर आहेत, पण आपण वापरत नाही, अशी ग्राहकांची खात्री असेल, ते नंबर ग्राहक दूरसंचार विभागाला कळवू शकतात. हे नंबर्स दूरसंचार विभागाकडून ब्लॉक केले जाऊ शकतात किंवा निष्क्रीय केले जाऊ शकतात. ग्राहकांना त्यांच्या अर्जाचा रेफरन्स आयडी दिला जाईल. त्याच्या आधारे त्यांना त्यांच्या रिक्वेस्टवरची कार्यवाही कुठपर्यंत आली आहे, याची माहिती मिळू शकेल.

    First published:

    Tags: Smartphone, Tech news