नवी दिल्ली, 6 मार्च : उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये कुठे जाण्याचा प्लॅन करत असाल, तर तुमच्यासाठी चांगली संधी आहे. या सुट्टीत गोव्याला जाण्याचा प्लॅन करू शकता. भारतीय रेल्वेने
(Indian Railway) यासाठी खास पॅकेज आणलं आहे. आयआरसीटीसीची
(IRCTC) ग्लोरियस गोवा
(Glorious Goa) अशी टूर ऑफर पॅकेज आहे. या पॅकेजमध्ये तुम्ही स्वस्तात गोव्याचा
(Goa Tour) आनंद घेऊ शकता.
IRCTC च्या या पॅकेजमध्ये तुम्ही मनसोक्त गोवा फिरू शकता. IRCTC च्या Glorious Goa Tour पॅकेजमध्ये थर्ड एसी आणि स्लीपर क्लासमधून प्रवास करता येईल. या पॅकेजमध्ये ब्रेकफास्ट, डीनर, शेअरिंग बेसिसवर हॉटेल स्टे मिळेल. Aguada Beach, Candolim Beach, ओल्ड गोवा चर्च, मंगेशी मंदिर, Baga Beach, Dona Paula Beach, Calangute Beach अशी ठिकाणी फिरता येईल.
महत्त्वाची बाब म्हणजे काही कारणास्तव ही टूर एकदा बुकिंग केल्यानंतर कॅन्सल करायची असल्यास तसाही पर्याय यात दिला गेला आहे. कॅन्सेलेशनचा पर्यायही पर्यटकांसाठी आहे. टूरच्या 15 दिवस आधी बुकिंग कॅन्सल केल्यास तुम्हाला प्रति व्यक्ती 250 रुपये चार्ज द्यावा लागेल. त्याशिवाय 14 ते 8 दिवस आधी टूर कॅन्सल केल्यास 25 टक्के चार्ज भरावा लागेल. 7 ते 4 दिवस पहिले ग्लोरियस गोवा टूर बुकिंग कॅन्सल केल्यास 50 टक्के चार्ज भरावा लागेल. आणि 4 दिवसांहून कमी दिवस उरलेले असताना बुकिंग रद्द केल्यास रिफंड मिळणार नाही.
Glorious Goa पॅकेज Tour IRCTC च्या अधिकृत वेबसाइट www.irctctourism.com वरुन बुक करू शकता. त्याशिवाय इतर रिजनल ऑफिसेसमध्येही IRCTC ची ही गोवा टूर बुक करू शकता. हे पॅकेज 4 दिवस आणि 3 रात्री असं आहे. पॅकेजची सुरुवातीची किंमत 9660 रुपये आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.