मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /

रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी; तिकीट बुकिंग झालं सोपं, सणासुदीच्या काळात IRCTC चा मोठा निर्णय

रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी; तिकीट बुकिंग झालं सोपं, सणासुदीच्या काळात IRCTC चा मोठा निर्णय

रेल्वे तिकीट बुकिंगची प्रक्रिया सुलभ व्हावी, यासाठी `आयआरसीटीसी`ने एका विदेशी कंपनीची सल्लागार म्हणून नियुक्ती केली आहे. यामुळे ई-तिकीट बुकिंग (E-Ticket Booking) करताना प्रवाशांना अडचणी जाणवणार नाहीत

मुंबई 12 ऑगस्ट : किफायतशीर आणि आरामदायी प्रवास या कारणांमुळे सर्वसामान्य नागरिक लांबच्या प्रवासासाठी रेल्वेचा (Railway) पर्याय निवडतात. सणासुदीच्या काळात (Festive season) अनेकजण पर्यटनासाठी किंवा आपल्या मूळ गावी जातात. या काळात रेल्वे तिकीट बुकिंग करणं हे त्रासदायक आणि अवघड होतं. बऱ्याचदा रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन अर्थात आयआरसीटीसीच्या (IRCTC) वेबसाइटवर तिकीट बुकिंगसाठी लोड वाढल्याने सर्व्हर डाउन होतो. त्यामुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागतो. या पार्श्वभूमीवर `आयआरसीटीसी`ने एक महत्त्वाचं पाऊल उचललं आहे. यामुळे आता रेल्वे तिकीट बुकिंगसाठी (Railway Ticket Booking) प्रवाशांना होणारा त्रास निश्चितच कमी होणार आहे. स्मार्टफोन, लॅपटॉप स्वस्त होण्याची शक्यता; सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत प्रवाशांच्या वाढत्या तक्रारींची नोंद घेऊन `आयआरसीटीसी`नं हे पाऊल उचललं आहे. या विशेष उपाययोजनेमुळे प्रवाशांना तात्काळ रेल्वे तिकीट बुकिंग करणं शक्य होणार आहे. `एबीपी लाइव्ह`ने याबाबतचं वृत्त दिलं आहे. सणासुदीच्या काळात प्रवासाचं नियोजन करताना नागरिकांना सर्वप्रथम रेल्वे तिकीट बुकिंगची मोठी काळजी सतावते. अर्थात त्यामागे कारणंही तशीच आहेत. बऱ्याचदा लोड वाढल्यानं `आयआरसीटीसी`चा सर्व्हर डाउन होणं, वेळेवर तिकीट बुकिंग करता न येणं यांसारख्या समस्या प्रवाशांना जाणवतात. त्यामुळे `आयआरसीटीसी`ने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. रेल्वे तिकीट बुकिंगची प्रक्रिया सुलभ व्हावी, यासाठी `आयआरसीटीसी`ने एका विदेशी कंपनीची सल्लागार म्हणून नियुक्ती केली आहे. यामुळे ई-तिकीट बुकिंग (E-Ticket Booking) करताना प्रवाशांना अडचणी जाणवणार नाहीत. विशेष म्हणजे, गेल्या दोन ते तीन वर्षांत एकूण आरक्षित तिकिटांच्या संख्येत ई-तिकिटांचा वाटा मोठ्या प्रमाणात वाढला आहे. एकूण आरक्षित तिकिटांपैकी सुमारे 80 टक्के तिकिटं `आयआरसीटीसी`द्वारे म्हणजेच ऑनलाइन बुक केली जात आहेत. 2026-2017 मध्ये ई-तिकिटांचा वाटा 60 टक्के होता. तो आता वाढून 80 टक्के झाला आहे. त्यामुळे रेल्वेला सणासुदीच्या काळात दलालांपासून मुक्ती मिळणार आहे. नवरात्रोत्सव, दुर्गापूजा, दिवाळी आणि छटपूजेसारख्या सणांदरम्यान रेल्वे तिकीट मिळणं खूपच अवघड असतं. त्यातही कन्फर्म आणि तत्काळ तिकीट मिळणं अजून अवघड असतं. अनेकदा तिकीट बुकिंग करतेवेळी सर्व्हर डाउन झाल्याने प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागतो. त्यामुळे विदेशी कंपनीला ई-तिकीट बुकिंगसाठी सल्लागार (Consultant) म्हणून नियुक्त केलं जाणार आहे. यामुळे गर्दीच्या काळात सर्व्हर डाउन होण्याची समस्या दूर होणार आहे. तसंच प्रवाशांना विनात्रास रेल्वे तिकीट बुकिंग करता येणार आहे, असं सूत्रांनी सांगितलं.
First published:

Tags: Indian railway

पुढील बातम्या