मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /

Amazon Festival Sale : अॅमेझॉन फेस्टिव्हल सेलमध्ये या 5G स्मार्टफोनवर मिळू शकते 4 हजार रुपयांपर्यंतची सवलत

Amazon Festival Sale : अॅमेझॉन फेस्टिव्हल सेलमध्ये या 5G स्मार्टफोनवर मिळू शकते 4 हजार रुपयांपर्यंतची सवलत

अॅमेझॉन ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेलमध्ये सर्वोत्कृष्ट फोनवर अनेक ऑफर्स दिल्या जात आहेत. सेलमधल्या प्रत्येक सेगमेंटच्या फोनवर असलेल्या ऑफर्समध्ये ग्राहकांना स्वस्तात स्मार्टफोन (smartphone) खरेदी करण्याची संधी मिळणार आहे.

नवी दिल्ली, 27 ऑक्टोबर : सध्या ऑनलाइन शॉपिंगचा (online shopping) ट्रेंड मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. सणासुदीला (festival) सुरुवात झाली असून लवकरच दिवाळी (Diwali) येणार आहे. त्यामुळे प्रमुख ई-कॉमर्स वेबसाइट्सनी (e-commerce websites) फेस्टिव्हल सेल (festival sales) सुरू केले आहेत. यामध्ये अनेक ऑफर्स दिल्या जात आहेत. या सेलमध्ये स्वस्तात वस्तू खरेदी करता येत आहेत. अॅमेझॉन इंडियाचा (Amazon India) दी ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेल (The Great Indian Festival Sale) सुरू आहे.

अॅमेझॉन ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेलमध्ये सर्वोत्कृष्ट फोनवर अनेक ऑफर्स दिल्या जात आहेत. सेलमधल्या प्रत्येक सेगमेंटच्या फोनवर असलेल्या ऑफर्समध्ये ग्राहकांना स्वस्तात स्मार्टफोन (smartphone) खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. किंमत कमी करण्याबरोबरच ग्राहकांना बँक ऑफरमध्ये सूट दिली जात आहे. या सेलमधल्या सर्वोत्कृष्ट ऑफरमध्ये ग्राहकांना मध्यम रेंजमधल्या iQOO Z3 या स्मार्टफोनवर चांगली सूट मिळेल. या वर्षी जूनमध्ये लाँच झालेल्या ह्या स्मार्टफोनची किंमत तेव्हा 19,990 रुपये होती; पण सेलमध्ये हा फोन 18,990 रुपयांमध्ये मिळेल. या फोनवर एवढीच ऑफर नाही, तर 15,598 रुपयांनाही हा फोन खरेदी करणं शक्य. म्हणजेच फोनवर 4,392 रुपयांची सूट मिळू शकते. चला तर मग, जाणून घेऊ या ही ऑफर नक्की कशी आहे.

iQOO Z3 खरेदी करण्यासाठी HDFC कार्डने पेमेंट केलं गेलं, तर 3 हजार रुपयांची तात्काळ सूट दिली जाईल. त्यानंतर ह्या फोनची किंमत 15,990 रुपये होईल. याशिवाय 391 रुपयांची अतिरिक्त सूटदेखील दिली जात आहे. त्यानंतर हा फोन 15,598 रुपयांमध्ये मिळेल.

हे वाचा - Paytm IPO : पेटीएम 8 ते 10 नोव्हेंबरदरम्यान 18300 कोटींचा आयपीओ, वाचा सविस्तर

अॅमेझॉनने बँक ऑफरबद्दलदेखील सांगितलं आहे. ग्राहकांना अमेरिकन एक्स्प्रेस, सिटीबँक आणि आरबीएल बँक कार्डवर सूट दिली जात आहे. ऑफरअंतर्गत ग्राहकांना क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड आणि ईएमआय व्यवहारांद्वारे 10 टक्के त्वरित सूट दिली जात आहे. ही ऑफर 12 ऑक्टोबरपर्यंत उपलब्ध असेल.

iQOO Z3 ह्या 5G स्मार्टफोनमध्ये 6.58 इंच फुल-एचडी+ LCD डिस्प्ले देण्यात आला आहे. याचबरोबर 120Hz रिफ्रेश रेट, 90.61 स्क्रीन टू बॉडी रेशो, 20:9 आस्पेक्ट रेशियो आणि HDR सपोर्ट दिला गेला आहे. हा फोन क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 768G प्रोसेसरसह सुसज्ज आहे. या फोनमध्ये Adreno 620 जीपीयू, 8 जीबी LPDDR4X रॅम आणि 256 जीबी UFS 2.2 स्टोरेज देण्यात आलं आहे.

हे वाचा - व्यक्तीच्या मृत्यूनंतर Adhar Card , Pan Card या अत्यावश्यक ओळखपत्रांचं काय करावं? जाणून घ्या प्रोसेस

सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी या फोनमध्ये एफ / 2.0 अॅपर्चरसह 16 मेगापिक्सेलचा कॅमेरा आहे. पॉवरसाठी फोनमध्ये 4400mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. बॅटरीला 55W फास्ट चार्जिंग सपोर्ट आहे.

iQOO Z3 मध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप आहे. त्यात f/1.79 अॅपर्चरसह 64 मेगापिक्सेलचा प्रायमरी कॅमेरा, f/2.2 अॅपर्चरसह 8 मेगापिक्सेलचा अल्ट्रा-वाइड-अँगल कॅमेरा आणि f/2.4 अॅपर्चरचा 2 मेगापिक्सेलचा कॅमेरा उपलब्ध आहे.

First published:

Tags: Amazon, Diwali 2021, Mobile