Home /News /technology /

Apple चा मोठा निर्णय! कंपनी ‘या’ प्रॉडक्टचं उत्पादन आणि विक्री बंद करणार

Apple चा मोठा निर्णय! कंपनी ‘या’ प्रॉडक्टचं उत्पादन आणि विक्री बंद करणार

Apple च्या प्रॉडक्ट्सचे चाहते असणाऱ्यांसाठी एक वाईट बातमी आहे. Apple चे अनेक प्रॉडक्ट बाजारात उपलब्ध आहेत, त्यापैकी एक प्रॉडक्ट बंद करण्याचा कंपनीने निर्णय घेतलाय.

नवी दिल्ली, 11 मे : Apple चे प्रॉडक्ट्स अनेकांना आवडतात. Apple चे अनेक प्रोडक्ट्स अनेकांच्या विशलिस्टमध्ये असतात. आयफोन (iPhone) घ्यावा किंवा Apple चं एकतरी प्रॉडक्ट घ्यावं, असं अनेकांचं स्वप्न असतं. लोक सेव्हिंग करून आयफोन, स्मार्टवॉच (Smartwatch) आणि इतर प्रॉडक्ट्स (Apple Products) खरेदी करताना दिसतात. पण Apple च्या प्रॉडक्ट्सचे चाहते असणाऱ्यांसाठी एक वाईट बातमी आहे. Apple चे अनेक प्रॉडक्ट बाजारात उपलब्ध आहेत, त्यापैकी एक प्रॉडक्ट बंद करण्याचा कंपनीने निर्णय घेतलाय. कंपनीने 20 वर्षांपूर्वी आलेलं त्यांचं म्युझिक स्ट्रीमिंग डिव्हाईस iPod बंद करण्याची घोषणा केली आहे. iPod 20 वर्षांपूर्वी लाँच करण्यात आलं होतं. विशेष गोष्ट म्हणजे iPod संगीत प्रेमींसाठी (Music Lover) आवडतं स्ट्रीमिंग म्युझिक गॅझेट (Streaming Music Gadget) झालं होतं. परंतु, कंपनीने ते बंद करण्याचा निर्णय घेतलाय. न्यूजरूम वेबसाइटनुसार, कंपनीचं लेटेस्ट एडिशन iPod Touch, आता फक्त साठा संपेपर्यंत उपलब्ध असेल. आयफोन निर्मात्यांनी iPod टच बंद करणार असल्याची घोषणा केली आहे. 21 वर्षांत Apple ने iPod ची अनेक एडिशन्स लाँच केली, परंतु आता आयपॉड टच बंद करण्याचा कंपनीने निर्णय घेतला आहे. आता उपलब्ध असलेला स्टॉक संपल्यानंतर आयपॉड टच युजर्सना खरेदी करता येणार नाही. एकेकाळी सर्वांत लोकप्रिय ठरलेल्या या आयपॉडला हळूहळू इतर प्रॉडक्ट्सनी विशेषत: iPhone ने मागे टाकलं. कंपनीने iPod क्लासिक तयार करणं बंद केलं. आयफोन क्लासिक (iPhone Classic) हे क्लिक व्हील असलेलं एक एडिशन होतं. त्यात एक छोटी स्क्रीन यायची, जी 2014 मधील ओरिजनल एडिशनसारखी होती. आणि 2017 मध्ये Apple ने त्याचं सर्वांत लहान म्युझिक प्लेअर, iPod नॅनो आणि iPod Shuffle यांचं उत्पादन थांबवलं.

हे वाचा - Android Smartphone वापरता? आजपासून हे Apps बंद, Google ची नवी पॉलिसी

2001 मध्ये झाली होती सुरुवात - आयपॉड या लोकप्रिय MP3 प्लेअरची 2001 मध्ये सुरुवात झाली आणि त्याची क्षमता 1,000-ट्रॅकची आहे. Apple च्या स्ट्रीमिंग सर्व्हिस Apple Music कडे आता 90 मिलियनहून अधिक गाणी उपलब्ध आहेत. हे टोनी फॅडेल यांनी डिझाईन केलं होतं, त्यांनीच पुढे आयफोन तयार केला होता. सध्या, Apple iPod Touch हे एकमेव मॉडेल उपलब्ध आहे आणि भारतात त्याची किंमत 19,600 रुपये आहे. हे मॉडेल स्पेस ग्रे, सिल्व्हर, पिंक, ब्लू, गोल्ड आणि प्रॉडक्ट रेड या सहा रंगांमध्ये उपलब्ध हे. हे मॉडेल तीन स्टोरेज ऑप्शनसह उपलब्ध आहे. त्यामध्ये 32GB, 128GB आणि 256GB चा समावेश आहे. आयपॉडचं हे मॉडेल तुम्हाला विकत घेता येऊ शकतं.
First published:

Tags: Apple, Iphone, Tech news

पुढील बातम्या