सोन्यात मढवलेल्या एका iPhone च्या किंमतीत किती आयफोन येतील तुम्हीच बघा!

सोन्यात मढवलेल्या एका iPhone च्या किंमतीत किती आयफोन येतील तुम्हीच बघा!

  • Share this:

मुंबई, 13 डिसेंबर : सर्वात महागडा आणि सुरक्षित असा फोन म्हणून अॅपल आयफोन ओळखला जातो. एक स्टेटस म्हणूनही तो वापरला जातो. पण त्यालाही आणखी वेगळा लूक देण्यात आला आहे. यामुळे त्याची आधीच हजारातून लाखात पोहचलेली किंमत कोटींच्या जवळ गेली आहे. कॅव्हिअर या रशियन डिझायनर कंपनीने आयफोनचा लक्झरी मेकओव्हर केला आहे.

यंदा लाँच झालेल्या iPhone 11 Pro चा मेकओव्हर कंपनीने केला आहे. त्यासाठी हिरे आणि सोन्याचा वापर करण्यात आला. या नव्या डिझाइन केलेल्या आयफोनचं नाव Credo Christmas Star Diamond iPhone 11 असं ठेवण्यात आलं आहे.

फोनच्या मागच्या बाजूवर ख्रिसमसचा सिन दाखवला आहे. यात गोल्ड पॅटर्नचा वापर केला असून हिऱ्यांचे डिझाइन करण्यात आलं आहे. येशू, मेरी आणि जोसेफ यामध्ये कोरण्यात आले आहेत.

अरे देवा! लवकरच बंद होणार फ्री Call आणि Data, TRAIचे संकेत

सोने आणि हिऱ्यांनी मढवलेला हा फोन 91 लाख 20 हजार रुपयांना आहे. तसेच हिऱ्यांशिवाय फक्त सोन्याचा वापर केलेल्या फोनची किंमत 4 लाख 25 हजार रुपयांपर्यंत आहे. सिल्व्हरमध्येही हा फोन उपलब्ध असून त्याची किंमत 6 लाख 36 हजार रुपयांपर्यंत आहे. iPhone 11 Pro च्या 64 जीबी फोनची किंमत 99 हजार 999 इतकी आहे. त्याच्या 90 पट जास्त किंमत सोने आणि हिऱ्यांनी मढवलेल्या फोनसाठी मोजावी लागते.

सावधान! तुमचा कॉल रेकॉर्ड होतोय? जाणून घ्या कसं चेक करायचं

स्मार्टफोनमध्ये सर्वात धोकादायक Bug; चेक करा तुमचा मोबाइल सुरक्षित आहे का?

 

Published by: Suraj Yadav
First published: December 13, 2019, 8:58 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading