मोबाईलमधील बग शोधा आणि 7 कोटी रुपयांचं बक्षीस मिळवा!

मोबाईलमधील बग शोधा आणि 7 कोटी रुपयांचं बक्षीस मिळवा!

मोबाईलमधील त्रुटी शोधणाऱ्याला कंपनीने 7 कोटी रुपयांचं बक्षीस देण्याची ऑफर दिली आहे.

  • Share this:

मुंबई, 10 ऑगस्ट : आयफोन तयार करणाऱ्या अॅपल कंपनीने त्यांच्या मोबाईलमधील त्रुटी शोधण्याचं आव्हान ग्राहकांना दिलं आहे. खरंतर सर्वात सुरक्षित समजल्या जाणाऱ्या आयफोनमध्ये त्रुटी शोधणं कठीण आहे. यासाठी बड्या सायबर सुरक्षेचं काम करणाऱ्या कंपन्याही प्रयत्न करत असतात. आयफोनच्या सुरक्षेत त्रुटी शोधणाऱ्याला जवळपास 7 कोटी रुपयांचं बक्षीस दिलं जाणार आहे.

आयफोनच्या सुरक्षेतील त्रुटी शोधण्यासाठी अॅपलकडून 7 कोटी रुपये दिले जाणार आहेत. कोणत्याही सुरक्षा व्यवस्थेतील कमतरता जाणून घेण्यासाठी देण्यात येणारी ही सर्वात मोठी रक्कम आहे. अॅपलने याआधी त्यांच्या अनेक उत्पादनांची सुरक्षा तपासण्यासाठी अशा प्रकारची ऑफर दिली होती. यावेळी सर्वात मोठी रक्कम बक्षीस म्हणून देण्यात येईल.

लास वेगास इथं दरवर्षी एक कार्यक्रम होतो. त्या कार्यक्रमात कंपनीच्यावतीनं सांगण्यात आलं की, मॅक सॉफ्टवेअर आणि इतर आव्हानं अॅड करून प्रोसेस सुरू करण्यात येणार आहे. या प्रोसेसमध्ये कंपनी काही रिवॉर्डही देणार आहे. ज्यांना आयफोनमधील त्रुटी सापडेल त्यांना बक्षीस दिलं जाईल. याआधी आयफोनमध्ये बग शोधणाऱ्याला दीड कोटी रुपयांचं बक्षीस दिलं जात होतं.

फक्त एका क्लिकने वाढवू शकता फोनचा स्पीड, हँग होणार नाही मोबाइल!

Xiaomi लॉन्च करणार 100 मेगापिक्सल कॅमेऱ्याचा फोन

SPECIAL REPORT: आधी अन्नासाठी तडफड आणि आता पुरग्रस्तांसमोर रोगराईचं संकट!

Published by: Suraj Yadav
First published: August 10, 2019, 2:29 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading