मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /

iPhone SE स्वस्तात खरेदीची संधी, Flipkart वर बंपर ऑफर

iPhone SE स्वस्तात खरेदीची संधी, Flipkart वर बंपर ऑफर

नवा iPhone खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर तुमच्यासाठी चांगली संधी आहे. iPhone SE2 तुम्ही बजेटमध्ये खरेदी करू शकता. iPhone SE3 च्या लाँचिंगनंतर iPhone SE2 स्वस्त पर्याय ठरतो आहे.

  • Published by:  Karishma

नवी दिल्ली, 27 मार्च : नवा iPhone खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर तुमच्यासाठी चांगली संधी आहे. नवा फोन तुम्ही स्वस्तात खरेदी करू शकता. ई-कॉमर्स वेबसाइट फ्लिपकार्टवर (Flipkart) iPhone वर ऑफर असून यात चांगल्या दरात फोन घेता येईल. iPhone SE2 तुम्ही बजेटमध्ये खरेदी करू शकता. iPhone SE3 च्या लाँचिंगनंतर iPhone SE2 स्वस्त पर्याय ठरतो आहे.

काय आहे ऑफर -

Apple iPhone SE2 Red 128GB वेरिएंट फोन 44,900 रुपयांत लाँच करण्यात आला होता. सध्या हा फोन फ्लिपकार्ट ऑफरमध्ये (Flipkart Offer) 37 टक्के डिस्काउंटमध्ये खरेदी करता येईल. या सूटनंतर फोनची किंमत 27999 रुपये होते. सिटी बँक (CITI Bank) युजर्ससाठी आणखी एक ऑफर आहे. जर तुम्ही या बँकेचं क्रेडिट किंवा डेबिट कार्ड वापरलं तर आणखी 1000 रुपये इन्स्टंट डिस्काउंट मिळेल आणि iPhone SE2 तुम्हाला 26,999 रुपयांत खरेदी करता येईल.

iPhone SE2 वर आणखी एक एक्सचेंज ऑफरही आहे. तुमचा जुना फोन एक्सचेंज केल्यास 13000 रुपयांची बचत करता येईल. या एक्सचेंज ऑफरचा संपूर्ण फायदा मिळाल्यास iPhone SE2 13,999 रुपयांत खरेदी करता येईल. महत्त्वाची बाब म्हणजे फोनची एक्सचेंज ऑफर फोनच्या मॉडेलवर, किती वर्ष जुना आणि किती लेटेस्ट मॉडेल आहे यावर अवलंबून असतं.

हे वाचा - iPhone, Samsung सह इतर बड्या ब्रँड्सचे महागडे फोन स्वस्तात खरेदीची संधी, Flipkart ची काय आहे ऑफर?

iPhone SE2 च्या 64GB वेरिएंटची किंमत 25,999 रुपये आहे. तर 256GB वेरिएंट फोन 44,999 रुपयांत खरेदी करता येईल. Flipkart Offer मध्ये या फोनच्या सर्वच मॉडेलची किंमत कमी झालेली नाही.

काय आहेत फीचर्स -

A13 बायोनिक चिपसह (A13 Bionic) हा फोन डुअल सिम 4G फोन आहे. या फोनला 4.7 इंची रेटिना HD+ डिस्प्ले आणि क्विक चार्जिंग सपोर्ट मिळेल. फोनला 12 मेगापिक्सल सिंगल रियर कॅमेरा आणि 7 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. या फोनला ऑडिओ जॅक देण्यात आलेला नाही.

First published:

Tags: Apple, Flipkart, Iphone, Smartphone, Tech news