मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /Apple iphone SE 3 'या` दिवशी लाँच होणार, काय असेल किंमत?

Apple iphone SE 3 'या` दिवशी लाँच होणार, काय असेल किंमत?

आयफोन एसई 3 (iphone SE 3) लॉंच करण्याची तयारी देखील सुरू आहे. 8 मार्चला होणाऱ्या कार्यक्रमात आयफोन एसई 3 हा फोनही लॉंच केला जाणार असल्याची चर्चा आहे. पण हा फोन 8 मार्चऐवजी 10 मार्चला लॉंच होणार असल्याचं तज्ज्ञ सांगत आहेत.

आयफोन एसई 3 (iphone SE 3) लॉंच करण्याची तयारी देखील सुरू आहे. 8 मार्चला होणाऱ्या कार्यक्रमात आयफोन एसई 3 हा फोनही लॉंच केला जाणार असल्याची चर्चा आहे. पण हा फोन 8 मार्चऐवजी 10 मार्चला लॉंच होणार असल्याचं तज्ज्ञ सांगत आहेत.

आयफोन एसई 3 (iphone SE 3) लॉंच करण्याची तयारी देखील सुरू आहे. 8 मार्चला होणाऱ्या कार्यक्रमात आयफोन एसई 3 हा फोनही लॉंच केला जाणार असल्याची चर्चा आहे. पण हा फोन 8 मार्चऐवजी 10 मार्चला लॉंच होणार असल्याचं तज्ज्ञ सांगत आहेत.

  मुंबई, 5 मार्च : भारतात आयफोनची (iphone) लोकप्रियता सातत्याने वाढत आहे. वैशिष्ट्यपूर्ण डिझाईन, नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान आणि फीचर्समुळे युजर्सचा आयफोन खरेदीकडे कल वाढताना दिसत आहे. ग्राहकांची वाढती मागणी लक्षात घेत अ‍ॅपल (Apple) कंपनीदेखील कमी किमतीतले आयफोन भारतीय बाजारात उपलब्ध करुन देत आहे. अ‍ॅपलचा सर्वात मोठा `पीक परफॉर्मन्स` इव्हेंट (Peak Performance Event) 8 मार्च 22 रोजी होणार आहे. टेक तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, या पीक परफॉर्मन्स इव्हेंटमध्ये अ‍ॅपल स्वस्त आयफोन मॉडेल लाँच करू शकते. यात आयफोन एसई 3 (iphone SE 3) लॉंच करण्याची तयारी देखील सुरू आहे. 8 मार्चला होणाऱ्या कार्यक्रमात आयफोन एसई 3 हा फोनही लॉंच केला जाणार असल्याची चर्चा आहे. पण हा फोन 8 मार्चऐवजी 10 मार्चला लॉंच होणार असल्याचं तज्ज्ञ सांगत आहेत. त्यामुळे 8 मार्चला होणाऱ्या या महत्वपूर्ण इव्हेंटमध्ये नेमकं काय होतं, याकडे आयफोनच्या चाहत्याचं लक्ष लागलं आहे.

  `आयमोअर`च्या ताज्या रिपोर्टनुसार, आयफोन एसई 3 हा फोन 10 मार्चला रिलीज होईल. या फोनचं डिझाईन आयफोन एसईसारखं (iphone SE) असेल, असं बोललं जात आहे. या डिव्हाईसच्या माध्यमातून मोठे बेजल आणि फिंगरप्रिंट सेन्सर (FingerPrint Sensor) सुविधा पुन्हा मिळतील अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. आयफोन एसई जुन्या डिझाईनसह दाखल होण्याची अपेक्षा आहे. या चर्चेवर विश्वास ठेवायचा झाला तर तो A15 बायोनिक चिपसेटवर चालणारा असेल आणि या माध्यमातून अ‍ॅपलची सर्वात स्वस्त आयफोन 5G क्षमता उपलब्ध होईल. अलीकडील एका वृत्तानुसार, आगामी आयफोन एसई 3 सुमारे 23,000 रुपयांमध्ये लॉंच केला जाऊ शकतो.

  आयफोन एसईवर जबरदस्त ऑफर

  तुम्ही अ‍ॅपलचा सर्वात लोकप्रिय आयफोन अगदी कमी किमतीत खरेदी करू शकता. अ‍ॅपल आयफोन एसई सर्वात कमी किमतीत विक्रीसाठी उपलब्ध आहे. ई-कॉमर्स वेबसाईट फ्लिपकार्टवर (Flipkart) तुम्ही आयफोन एसई 15,499 रुपयांमध्ये खरेदी करू शकता. फ्लिपकार्ट अ‍ॅपल आयफोन एसईवर 24 टक्क्यांपर्यंत डिस्काउंट देत आहे. या फोनची मूळ किंमत 39,900 रुपये आहे. फ्लिपकार्टवर आयफोन एसई 30,299 रुपयांना विक्रीसाठी उपलब्ध आहे. पण फ्लिपकार्टवर तुम्ही जुना फोन एक्सचेंज करुन हा फोन घेणार असाल तर तुम्हाला 14,800 रुपयांपर्यंत सूट मिळू शकते. यामुळे अ‍ॅपल आयफोन एसईची किंमत घटून 15,499 रुपये होईल. त्यामुळे ग्राहकांना आयफोन एसई खरेदी करण्यासाठी ही चांगली सुवर्णसंधी ठरणार आहे. कारण या माध्यमातून ग्राहकांना आयफोन एसई खरेदीवर मोठी सूट मिळणार आहे.

  First published:

  Tags: Apple, Smartphone