• Home
  • »
  • News
  • »
  • technology
  • »
  • Apple लवकरच देणार ग्राहकांना Good News, I phone SE बाबत नवी माहिती समोर; बातमी वाचून व्हाल Happy

Apple लवकरच देणार ग्राहकांना Good News, I phone SE बाबत नवी माहिती समोर; बातमी वाचून व्हाल Happy

आयफोनच्या किंमती साधारण फोनपेक्षा कितीतरी पटीनं जास्त आहेत. त्यामुळे अनेकांना इच्छा असून देखील आयफोन खरेदी करता येत नाही.

  • Share this:
नवी दिल्ली, 25 ऑक्टोबर: अत्याधुनिक फीचर्स आणि उच्च दर्जाच्या सिक्युरिटी फीचर्समुळे अ‍ॅपलच्या (Apple) फोनचे जगभरात चाहते आहेत. एखाद्या व्यक्तीकडे आयफोन असणं हे स्टेटस सिम्बॉल समजलं जातं. कारण, आयफोनच्या किंमती साधारण फोनपेक्षा कितीतरी पटीनं जास्त आहेत. त्यामुळे अनेकांना इच्छा असून देखील आयफोन खरेदी करता येत नाही. अशा ग्राहकांसाठी कंपनीनं एक खास भेट आणली आहे. लवकरचं अत्याधुनिक फिचर्सनं सुसज्ज असलेला आणि माफक दरात असलेला एक फोन अ‍ॅपल लाँच करत आहे. झी न्यूजनं याबाबत वृत्त प्रसिद्ध केलं आहे. आयफोन एसई 3 (iPhone SE 3) असं या फोनचं नाव असून पुढील वर्षी तो बाजारात येणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या फोनची रचना 'क्लासिक' आयफोन SE (2020) (iPhone SE) सारखीच असेल. याशिवाय यामध्ये अशा अनेक गोष्टी आहेत ज्या नव्यानं समाविष्ट करण्यात आल्या आहेत. मागील आयफोन एसई मॉडेल हे आयफोन 8 (iPhone 8) प्रमाणे जुन्या आयफोन्सवर आधारित होतं. मात्र कंपनीनं आता त्याच्या फिचर्समध्ये काही बदल केले आहेत. आयफोन XR वर आधारित असलेला हा नवीन फोन 2022 च्या सुरुवातीला रिलीज होणार आहे. त्याचा डिस्प्ले एलसीडी (LCD Display) असणार आहे. बायोनिक ए 15 प्रोसेसर आणि 5 जी कनेक्टिव्हिटीसह मोबाईलमध्ये साइड-माऊंटेड फिंगरप्रिंट स्कॅनर देखील असेल. हेही वाचा-  Amazon Great Indian Festival 2021 : दिवाळीनिमित्त अमेझॉनवर या Smartwatch वर 75 टक्क्यांची सूट
 आयफोन एसई 3 या फोनला अत्याधुनिक म्हटलं जाऊ शकतं कारण यामध्ये iPhone XR सारखे फिजिकल टच आयडी बटण नसेल. हा पहिला एसई आयफोन असेल ज्यात फ्रंट फेसिंग बटण नसेल त्याऐवजी साइड-माऊंटेड फिंगरप्रिंट स्कॅनर फिचर मिळण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे या फोनची किंमत अपेक्षेपेक्षा कमी ठेवली जाणार आहे, अशी माहिती समोर येत आहे.
हेही वाचा-  जगातला सर्वात स्वस्त जिओ फोन नेक्स्ट कसा तयार झाला; पाहा JioPhone Next Making Video
स्टोरेज ऑप्शनच्या बाबतीत देखील हा फोन सरस असण्याची शक्यता आहे. एसई 3ची स्टोरेज सिस्टिम एसई 2 प्रमाणे असेल. समोर आलेल्या माहितीनुसार हा नवीन फोन 64जीबी, 128जीबी आणि 256जीबी या स्टोरेज व्हेरियंटसह उपलब्ध असेल. आयफोन एसई 3 बाबत अनेक तर्क समोर येत असले तरी अद्याप अ‍ॅपलनं अधिकृतपणे काही खुलासा केलेला नाही. समोर आलेल्या माहितीनुसार जर आयफोन एसई 3मध्ये वरिल सर्व फिचर्स असतील आणि त्याची किंमत देखील माफक असेल तर नक्कीच ही ग्राहकांसाठी मोठी पर्वणी असणार आहे.
Published by:Pooja Vichare
First published: