मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /स्वस्तात iPhone खरेदीची संधी, Amazon-Flipkart सेलमध्ये बंपर डिस्काउंट

स्वस्तात iPhone खरेदीची संधी, Amazon-Flipkart सेलमध्ये बंपर डिस्काउंट

ई-कॉमर्स कंपन्या अॅमेझॉन आणि फ्लिपकार्टवर सध्या सेल सुरू आहे. या सेलमध्ये iPhone वर जबरदस्त डिस्काउंट मिळतो आहे. त्यामुळे कमी किमतीत तुम्ही iPhone खरेदी करू शकता.

ई-कॉमर्स कंपन्या अॅमेझॉन आणि फ्लिपकार्टवर सध्या सेल सुरू आहे. या सेलमध्ये iPhone वर जबरदस्त डिस्काउंट मिळतो आहे. त्यामुळे कमी किमतीत तुम्ही iPhone खरेदी करू शकता.

ई-कॉमर्स कंपन्या अॅमेझॉन आणि फ्लिपकार्टवर सध्या सेल सुरू आहे. या सेलमध्ये iPhone वर जबरदस्त डिस्काउंट मिळतो आहे. त्यामुळे कमी किमतीत तुम्ही iPhone खरेदी करू शकता.

नवी दिल्ली, 7 मे : तुम्ही अँड्रॉइड फोनवरुन अपग्रेड होत आयफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर तुमच्यासाठी एक चांगली संधी आहे. ई-कॉमर्स कंपन्या अॅमेझॉन आणि फ्लिपकार्टवर सध्या सेल सुरू आहे. या सेलमध्ये iPhone वर जबरदस्त डिस्काउंट मिळतो आहे. त्यामुळे कमी किमतीत तुम्ही iPhone खरेदी करू शकता.

सध्या Amazon Summer Sale सुरू आहे. हा सेल 4 ते 8 मेपर्यंत सुरू राहणार आहे. तसंच Flipkart वरही बिग सेव्हिंग डेज सेल असून त्यातही अनेक ऑफर्स आहेत.

हे वाचा - केवळ 1700 रुपयात घरी आणता येईल iPhone 12, Flipkart Big Saving Days Sale ची भन्नाट ऑफर

Apple iPhone 11 -

Flipkart वर सध्या बिग सेव्हिंग डेज सेल सुरू आहे. हा सेल सेल 8 मेपर्यंत असणार आहे. सेलदरम्यान iPhone 11 केवळ 39,999 रुपयांत विक्री केला जात आहे. या फोनची किंमत 49,999 रुपये आहे. SBI क्रेडिट कार्डने फोन खरेदी केल्यास 1,250 रुपयांची सूट मिळेल. त्यामुळे फोनची किंमत 38,749 रुपये होईल. फोनवर 13000 रुपयांचा एक्सचेंज बोनसही दिला जात आहे. परंतु ही एक्सचेंज प्राइम तुमच्या फोनच्या कंडिशनवर अवलंबून आहे.

iPhone 12 -

iPhone 12 ची किंमत 70,900 रुपये आहे. पण Flipkart सेलमध्ये हा फोन 59,990 रुपयांत लिस्ट करण्यात आला आहे. SBI क्रेडिट कार्डने शॉपिंग केल्यास 3250 रुपयांचा डिस्काउंट मिळेल. एक्सचेंज ऑफरमध्ये 13000 रुपयांचा डिस्काउंट मिळवता येऊ शकतो.

हे वाचा - Apple iPhone 14 सीरीज यादिवशी होणार लाँच, सर्वात हटके फोनची काय असेल किंमत

iPhone 13 -

iPhone 13 वरही जबरदस्त डिस्काउंट आहे. 79,990 रुपयांच्या फोनवर 12 टक्के सूट दिली जात आहे. या सूटनंतर फोन 69,900 रुपयांत खरेदी करता येऊ शकतो. एक्सचेंज ऑफर अंतर्गत फोनवर 16000 रुपयांचा डिस्काउंट मिळवता येऊ शकतो.

दरम्यान, Apple iPhone 14 च्या नव्या सीरीजची मोठी चर्चा आहे. लाँचिंगआधी या फोनबाबत अनेक चर्चा असून बाजारात याच्या धमाकेदार एन्ट्रीची अनेकांना उत्सुकता आहे. टेक एक्सपर्ट्सनुसार, iPhone 14 ची नवी सीरीज सप्टेंबरमध्ये लाँच होऊ शकते.

First published:

Tags: Amazon, Apple, Flipkart, Iphone, Tech news