Home /News /technology /

iPhone किंवा Apple चे इतर प्रोडक्ट्स असली की नकली; असं ओळखा

iPhone किंवा Apple चे इतर प्रोडक्ट्स असली की नकली; असं ओळखा

Apple च्या कोणत्याही प्रोडक्ट्ससाठी मोठी किंमत मोजावी लागते. अनेक जण अ‍ॅपलचे प्रोडक्ट सेकंड हँडही विकत घेतात. पण इतके पैसे देऊनही जर अ‍ॅपलचे प्रोडक्ट नकली, बनावट निघाले तर? यासाठी असली-नकली प्रोडक्टमधील फरक समजणं गरजेचं आहे.

  नवी दिल्ली, 20 मे : Apple चे प्रोडक्ट्स महाग असतात. iPhone, MacBook किंवा AirPods कोणतंही प्रोडक्ट घेतलं, तरी त्यासाठी मोठी किंमत मोजावी लागते. पण इतके पैसे देऊनही जर अ‍ॅपलचे प्रोडक्ट नकली, बनावट निघाले तर? यासाठी असली-नकली प्रोडक्टमधील फरक समजणं गरजेचं आहे. iPhone पासून AirPods पर्यंत अ‍ॅपलचे अनेक प्रोडक्ट्स मार्केटमध्ये नकलीही मिळतात. तसंच अ‍ॅपलचे प्रोडक्ट अनेक जण सेकंड हँडही विकत घेतात. त्यामुळे याची ओळख करणं गरजेचं आहे. अ‍ॅपलचं कोणतंही प्रोडक्ट खरेदी करताना ते हातात घेऊन असली आहे की नकली ते समजू शकत नाही. कारण नकली प्रोडक्टही खऱ्या प्रोडक्टप्रमाणेच दिसतात. त्यासाठी योग्यरित्या पडताळणी करणं अतिशय गरजेचं आहे. असं ओळखा Apple प्रोडक्ट असली की नकली? या पद्धतीने अ‍ॅपल प्रोडक्ट असली आहे, की नकली याची माहितीही मिळेल आणि त्यासोबत प्रोडक्टची वॉरंटीही समजेल. अ‍ॅपलच्या या टूलने तीन गोष्टी समजू शकतील. पहिलं म्हणजे अ‍ॅपल प्रोडक्टची खरेदी वॅलिड आहे, की नाही, दुसरं म्हणजे टेक्निकल असिस्टेंस कधीपर्यंत वॅलिड आहे आणि तिसरं रिपेयर आणि सर्विस कव्हर अर्थात वॉरंटी आहे की एक्सपायर झाली आहे.

  (वाचा - लाखोंमध्ये एखादीच होते अशी गडबड; तरीही 2 lakh रुपयांत विकला गेला अनोख्या डिझाईनचा iPhone, पाहा PHOTO)

  जर डेटाबेसमध्ये प्रोडक्टचा सीरियल नंबर (IMEI) टाकल्यानंतर कोणतीही माहिती नाही, तर ते प्रोडक्ट नकली असू शकतं. किंवा त्याची खरेदी योग्यरित्या केलेली नाही. प्रोडक्ट तपासण्यासाठी https://checkcoverage.apple.com/ या लिंकवर जावं लागेल. ही अ‍ॅपलची अधिकृत लिंक आहे. येथे Serial Number एंटर करण्यासाठी सांगितलं जाईल. Serial नंबर नंतर खाली कोड टाकावा लागेल, त्यानंतर प्रोडक्टबाबत माहिती मिळेल.

  (वाचा - कोण पाहतंय तुमचा WhatsApp Profile Photo? ही आहे सोपी ट्रिक)

  अशाप्रकारे अ‍ॅपल प्रोडक्टची वॉरंटीही चेक करता येऊ शकते. त्याशिवाय फोन किंवा इतर वस्तू कधी खरेदी केली हे लक्षात नसेल, अ‍ॅपल केयर कव्हरेज किती बाकी आहे हे जाणून घेण्यासाठीही या लिंकचा वापर करू शकता.
  Published by:Karishma
  First published:

  Tags: Apple, Iphone, Tech news

  पुढील बातम्या