मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /

iPhone, Samsung सह इतर बड्या ब्रँड्सचे महागडे फोन स्वस्तात खरेदीची संधी, Flipkart ची काय आहे ऑफर?

iPhone, Samsung सह इतर बड्या ब्रँड्सचे महागडे फोन स्वस्तात खरेदीची संधी, Flipkart ची काय आहे ऑफर?

ई-कॉमर्स पोर्टल फ्लिपकार्टने (Flipkart) अनेक पॉप्युलर ब्रँडच्या रिफर्बिश्ड स्मार्टफोनचा सेल आणला आहे. या सेलमध्ये तुम्ही कमी किमतीत चांगला फोन खरेदी करू शकता.

  • Published by:  Karishma

नवी दिल्ली, 26 मार्च : ई-कॉमर्स पोर्टल फ्लिपकार्टने (Flipkart) अनेक पॉप्युलर ब्रँडच्या रिफर्बिश्ड स्मार्टफोनचा सेल आणला आहे. या सेलमध्ये तुम्ही कमी किमतीत चांगला फोन खरेदी करू शकता. कमी बजेटमध्ये चांगला स्मार्टफोन हवा असेल, तर फ्लिपकार्टवर चांगली संधी आहे. रिफर्बिश्ड स्मार्टफोनला प्लॅटफॉर्मवर लिस्ट होण्याआधी आधी 47 क्वॉलिटी चेक कराव्या लागतात. रिफर्बिश्ड स्मार्टफोनदेखील नव्या फोनप्रमाणेच पूर्णपणे चालू कंडिशनमध्ये असल्याचा दावा फ्लिपकार्टने केला आहे.

मागील काही वर्षात रिफर्बिश्ड स्मार्टफोनच्या मागणीत मोठी वाढ झाली आहे. रिफर्बिश्ड स्मार्टफोन सेकंड हँड फोन असतो असं मानलं जातं परंतु असं अजिबात नसतं. रिफर्बिश्ड स्मार्टफोन (Refurbished Phone) असा फोन असतो, जो एखाद्या समस्येमुळे कंपनी परत करते.

नवा फोन खरेदी केल्यानंतर त्यात बॅटरी, कॅमेरा, स्पीकर्स अशा अनेक समस्या अनेकांना येतात. अशा समस्यांच्या तक्रारी आल्यानंतर कंपनी फोन बदलून देते. त्यानंतर कंपनी तोच फोन नीट करुन पुन्हा बाजारात आणते, अशा फोनला रिफर्बिश्ड स्मार्टफोन बोलतात.

हे वाचा - तुम्ही कार, बाइक चालवता? हिट अँड रन अपघातात नुकसान भरपाईबाबत सरकारची महत्त्वपूर्ण माहिती

काही वेळा लोक आपल्या स्मार्टफोनला Exchange offer मध्ये बदलतात, ते टेस्टिंगनंतर Refurbished Phone म्हणून विक्री केले जातात.

Flipkart रिफर्बिश्ड स्मार्टफोन 47 प्रकारच्या गोष्टी तपासल्यानंतर विक्रीसाठी ठेवतो. युजर्सला कमी किमतीत चांगल्या ब्रँडचा महागडा फोन वापरण्याची संधी मिळते.

हे वाचा - iPhone 13 वर आतापर्यंतची सर्वात मोठी सूट, Flipkart च्या या ऑफरमध्ये मिळेल बंपर डिस्काउंट

या गोष्टी लक्षात ठेवाच -

- Refurbished Phone खरेदी करताना विक्रेत्याकडून दिलेल्या वॉरंटी पॉलिसी आवश्यक तपासा. Apple आणि Samsung सारखे मोठे ब्रँड्स आपल्या Refurbished Phone वर एक वर्षाची वॉरंटी देतात.

- असा फोन ऑनलाइन खरेदी करताना चांगल्या नामवंत ऑनलाइन साइटवरुनच खरेदी करा. कोणत्याही वेबसाइटवरुन Refurbished Phone खरेदी करताना ते चांगलं तपासा. तसंच त्याचे रिव्ह्यूही वाचा.

- Refurbished Phone खरेदी करताना IMEI नंबर तपासा. त्यासाठी *#06# डायल करुन IMEI नंबर माहित करुन घेता येईल.

First published:

Tags: Apple, Flipkart, Iphone, Smartphone, Tech news