आनंदाची बातमी! iPhone XR होणार आणखी स्वस्त; हे आहे 'देसी' कारण आणि 'देसी' किंमत

आनंदाची बातमी!  iPhone XR होणार आणखी स्वस्त;  हे आहे 'देसी' कारण आणि 'देसी' किंमत

जगामध्ये स्मार्टफोनच्या बाजारपेठेत भारताचा दुसरा क्रमांक लागतो. Apple चं जाळं आपल्या देशात पसरण्याचं हे कारण आहे.

  • Share this:

मुंबई, 22 ऑक्टोबर जगामध्ये स्मार्टफोनच्या बाजारपेठेत भारताचा दुसरा क्रमांक  लागतो. एवढे ग्राहक भारतात आहेत. त्यामुळे apple ने आपलं जाळं भारतात पसरवायला सुरुवात केली आहे.

Apple ने आपला लेटेस्ट आयफोन iPhone XR ची निर्मिती भारतामध्ये सुरू केली आहे. म्हणूनच या फोनची किंमत कमी होण्याची शक्यता आहे.  भारतामध्ये कंपनीने स्मार्टफोनची निर्मिती केली तर कंपनीलाही फायदा होऊ शकतो. एक नव्हे तर त्यात त्यांचे 2 फायदे आहेत. एक तर त्यांना आयात शुल्क भरावं लागणार नाही आणि दुसरं म्हणजे भारतामध्ये स्टोर उघडण्यासाठी लोकल आउटसोर्सिंग नॉर्म्सची मदत मिळेल.

स्मार्टफोन मार्केटच्या बाबतीत इतर देशांची तुलना केली असता भारताचा जगात दुसरा क्रमांक लागतो. त्यामुळे कंपनीने आपला भारतातला कारभार वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. अनेक चायनीज मोबाईल कंपन्यांनी भारताच्या स्मार्टफोनच्या बाजारपेठेत आपला जम बसवला आहे. त्याचा फटका Apple ला बसू शकतो. म्हणून त्यांनी त्यांच्या लेटेस्ट स्मार्टफोनची निर्मिती भारतात करण्याचा निर्णय घेतला असावा. Apple XR च्या मॉडेलची निर्मिती चेन्नईमध्ये होत आहे.

वाचा - तुम्हाला कोण ट्रॅक करतंय? नव्या अपडेटमुळे मिळणार रिपोर्ट

भारतात उत्पादन झालं तरी किंमत वाढवणार नाही हे कंपनीने निश्चित केलं आहे. म्हणूनच आयात केलेल्या आयफोनपेक्षा भारतात तयार झालेल्या आयफोनची किंमत कमी असणार आहे. Apple ने iPhone साठी तैवान, व्हिएतनाम, मेक्सिको, इंडोनेशिया आणि मलेशिया या देशांमध्ये मॅन्युफॅक्चरिंग प्लांट उभारण्याच्या तयारीत आहे.

वाचा -  108 MP कॅमेऱ्याचा फोन लाँच करणार Xiaomi, जाणून घ्या फिचर्स

सॅमसंग आणि वन प्लस यांची स्पर्धा पाहून iphone XR ची किंमत कंपनीने कमी केली आहे. iphone XR ला गेल्या वर्षी iphone XS आणि  iphone XS max या  मॉडेलमध्ये लाँच केलं होतं. यामध्ये सर्व फीचर्स सारखीच आहेत. पण स्क्रीन रिझोल्युशन कमी आहे. या मध्ये OLED चा वापर करण्या ऐवजी LCD चा वापर करण्यात आला  होता.  लाँचच्या वेळी या फोनची किंमत 76,900  रुपये होती, आता या फोनची किंमत 44,900 एवढी आहे.

वाचा - सावधान! फिंगरप्रिंट लॉकचा मोबाइल वापरताय? कोणाच्याही बोटानं होतोय अनलॉक

काही रिपोर्ट नुसार Apple  iphone 11 च्या  सिरीजची निर्मिती भारतात सुरू झाल्यानंतर फोनची किंमत आणखी कमी होईल. हा भारतीय बनावटीचा Iphone फक्त देशातच नाही तर भारताबाहेरही एक्सपोर्ट होईल, असं सांगण्यात येत आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा प्रयत्न आहे की, दक्षिण आशियामध्ये तिसऱ्या क्रमांकाची मोठी अर्थव्यवस्था असलेला भारत  स्मार्टफोन मॅन्युफॅक्चरिंग  हब असायला हवा. स्मार्टफोन कंपन्यादेखील भारतामध्ये एक्सपोर्ट हब बनवण्यासाठी उत्सुक आहेत. कारण चीनबरोबर अमेरिकेचं व्यापार युद्ध सुरू झाल्याने त्याचा परिणाम अनेक कंपन्यांच्या व्यापारावर होत आहे. मोबाईल कंपन्याही त्यामुळे भारतात नवीन बाजारपेठ निर्माण करण्यास उत्सुक आहेत.

--------------------------

अन्य बातम्या

दिवाळीच्या आधी सोन्याला झळाळी, चांदीलाही आली चमक, हे आहेत आजचे दर

भारतीय कंपनीने लाँच केलं जगातलं सर्वात महागडं चॉकलेट, किंमत ऐकून व्हाल थक्क

मतमोजणीच्या तोंडावर नवा सर्व्हे, वंचित आणि मनसे उघणार खातं!

Published by: Manoj Khandekar
First published: October 23, 2019, 8:29 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading