iPhone वापरणाऱ्यांनो व्हा सावधान, कॉल न उचलता ऐकायला जातंय तुमचं बोलणं

iPhone वापरणाऱ्यांनो व्हा सावधान, कॉल न उचलता ऐकायला जातंय तुमचं बोलणं

iPhone मध्ये एक नवीन बग आला आहे. ज्यामुळे रिसिव्हरने कॉल न उचलचा त्याचा आवाज समोरच्या व्यक्तीला ऐकायला जात आहे.

  • Share this:

मुंबई. 29 जानेवारी : गेल्या काही दिवसांपूर्वी iPhone मध्ये एक असा बग आला आहे. ज्यामध्य युजरने व्हिडिओ कॉल रिसिव्ह नसेल केला तरी कॉल करणाऱ्याला रिसिव्हच्या सगळ्या गोष्टी ऐकू येतात. त्यामुळे iPhone युजर चिंतेत आले आहेत. या बगला फिक्स करण्यासाठी लवकरच एक सॉफ्टवेअर लाँच करणार असल्याची माहिती अॅपल इँकने दिली आहे.

या बगमध्ये iPhone युजरला अॅपलच्या Face Time अॅपच्या माध्यामातून व्हिडिओ कॉल केल्यास समोरील व्यक्तीने कॉल रिसिव्ह केला नसेल तरीही ते सगळं ऐकू शकत आहे. हा बग अॅपलच्या ग्रूप कॉलिंग फिचरमध्ये आला आहे. अॅपलने या फिचरची घोषणा गेल्या वर्षी मे महिन्यामध्ये केली होती. पण लगेचच iOS 12 च्या टेस्ट वर्जनसाठी या फिचरला रिमूव्ह करण्यात आलं आणि साधारणपणे गेल्याच वर्षी ऑक्टोबर महिन्यात हा फिचर रिलीज केला.

याबाबत विधान करत अॅपलच्या प्रवक्त्यांनी सांगितलं की, 'आम्हाला या समस्येबाबत माहिती मिळाली आहे आणि या आठवड्यात सॉफ्टवेअरला अपडेट करून याच्या फिचरला रिलीज केलं जाईल.

या फिचरमुळे तुमचा संवाद समोरच्या व्यक्तीला ऐकायला जाऊ शकतो. म्हणूनच हे ऑडियो बग बंद करण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय नाही. जोपर्यंत या बगला अपडेट केलं जात नाही तोपर्यंत तुम्ही तुमच्या अॅपल डिव्हाईसमधून Face Time या अॅपला डिसेबल करून ठेवा.

तुमच्या आयफोन, आयपॉड टच आणि आयपॅडमध्ये Face Time अॅपला डिसेबल करण्यासाठी Settings मध्ये जाऊन आणि नंतर Face Time ला निवडा. त्यानंतर उजव्या बाजुला दिलेलं बटन दाबून ऑफ करा. तसेच Mac वर बंद करण्यासाठी Face Time उघडा, त्यानंतर डाव्या बाजुला दिलेल्या मेन्यूबारमध्ये जावे आणि फेस टाईम ऑफ करावं

First published: January 29, 2019, 7:58 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading