महागडा iPhone फक्त 14,199 रुपयांत, भरघोस सूट मिळण्याची संधी फक्त आजच

महागडा iPhone फक्त 14,199 रुपयांत, भरघोस सूट मिळण्याची संधी फक्त आजच

फ्लिपकार्टवर सुरु असलेल्या अॅपल डेज सेलमध्ये अॅपल प्रोडक्ट आयफोन, आयपॅड कमी किंमतीत उपलब्ध होत आहेत.

  • Share this:

मुंबई, 08 डिसेंबर : फ्लिपकार्टवर सुरु असलेल्या अॅपल डेज सेलचा आज 8 डिसेंबर शेवटचा दिवस आहे. या सेलमध्ये अॅपल प्रोडक्ट आयफोन, आयपॅड कमी किंमतीत उपलब्ध होत आहे. अॅपल फोनच्या किंमती जास्त असल्याने अनेकदा त्या घेण्याची इच्छा असूनही घेता येत नाहीत. या सेलमुळे स्वस्तात मिळणार असल्याने आय़फोन घेण्याची इच्छा पूर्ण होईल.

iPhone XR मधील 128 GB वेरिअंटवर ग्राहकांना 5000 सूट मिळत आहे. जर तुमच्याकडे HDFC क्रेडिट/डेबिट कार्ड असेल तर यावर 5 हजार रुपयांची सूट मिळेल.

iPhone 8 मालिकेतील 64GB वेरिअंटवर 5 हजार 901 रुपयांचा डिस्काउंट आहे. फोनची किंमत 39,900 रुपये असून अॅपल डेज सेलमध्ये फक्त 33 हजार 999 रुपयांत खरेदी करता येणार आहे.

iPhone 7 32GB रोज गोल्ड खरेदी केल्यास त्यावर 16 टक्के इतकी सूट दिली जात आहे. 29 हजार 900 रुपयांचा हा फोन 24 हजार 999 रुपयांत उपलब्ध आहे. याशिवाय 14 हजार 199 रुपयांतही तो खरेदी करता येईल. यासाठी एक्सचेंज ऑफर देण्यात येत असून यामध्ये 10 हजार 800 रुपयांची सूट दिली जात आहे.

iPhone 11 (upto 256 GB)अॅपलच्या लेटेस्ट फोनवर 6 हजार रुपयांची सूट दिली जात आहे. या फोनची किंमत 64 हजार 900 रुपये इतकी आहे. ही सूट मिळवण्यासाठी HDFC डेबिट/क्रेडिट वरून पेमेंट करावं लागेल.

iPhone 11 Pro (upto 512 GB) या फोनची खरेदी HDFC कार्डवरून केल्यास 7 हजार रुपयांची सूट मिळेल. फोनची मूळ किंमत 99 हजार 900 रुपये इतकी आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: apple
First Published: Dec 8, 2019 08:18 AM IST

ताज्या बातम्या