लवकरच लाँच होणार iPhone 9, कमी किंमतीत मिळणार जबरदस्त फीचर्स

लवकरच लाँच होणार iPhone 9, कमी किंमतीत मिळणार जबरदस्त फीचर्स

अॅपल आयफोन सिरीजमध्ये लवकरच स्वस्तातला आयफोन येणार आहे. अॅपलकडून मार्च महिन्यात आयफोन 9 लाँच केला जाण्याची शक्यता आहे.

  • Share this:

महागडे आणि सुरक्षित अशी ओळख असलेल्या अॅपल आयफोन सिरीजमध्ये लवकरच स्वस्तातला आयफोन येणार आहे. अॅपलकडून मार्च महिन्यात आयफोन 9 लाँच केला जाण्याची शक्यता आहे. गेल्या काही दिवसांपासून याची चर्चा होत आहे. या फोनचे दुसरे नाव iPhone SE2 असल्याचं सांगितलं जात आहे. हा फोन फेब्रुवारी किंवा मार्चमध्ये लाँच होऊ शकतो.

आयफोन 9 मिडरेंज सेगमेंटमध्ये अॅपलचा हा पहिलाच फोन असणार आहे. हा आयफोन 8 सारखाच दिसेल तर प्रोसेसर अॅपल ए13 सारखा असेल. सध्या तरी या मोबाईलबद्दल काही माहिती समोर आलेली नाही. मात्र काही टेक ब्लॉगर्सनी याची फीचर्स सांगितली आहेत. यामध्ये अॅपलचे लेटेस्ट व्हर्जन iOS असेल. तसेच फेस आयडीऐवजी टच आयडी असेल.

कॅमेऱ्याच्या बाबतीत सांगायचं तर ड्युअल रिअर कॅमेरा देण्यात येणार आहे. अॅपल सध्या OLED डिस्प्लेवर भर देत आहे. मात्र आय़फोन 9 मध्ये एलसीडी डिस्प्ले पॅनेल असेल. कंपनी आता आयफोन एक्स आर कमी दरात उपलब्ध करून देत आहे. त्याचप्रमाणे आयफोन 9ची किंमत अंदाजे 399 डॉलर म्हणजेच 28 हजार रुपयांपर्यंत असेल असं सांगण्यात येत आहे.

Alert: तुमच्या बँकिंग ट्रांझेक्शन्सवर लक्ष ठेवा, युजरनेम-पासवर्डची होत आहे चोरी!

अॅपलने त्यांच्या आयफोन सिरीजमध्ये आयफोन 9 काढला नव्हता. आय़फोन 8 नंतर थेट आयफोन X लाँच केला होता. तर 2016 मध्ये कंपनीने आयफोन एसई लाँच केला होता. त्यालाही ग्राहकांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता.

Google ला बनवलं उल्लू! रस्त्यावर एकटा असूनही मॅपने दाखवलं ट्राफिक जाम

First published: February 11, 2020, 1:26 PM IST

ताज्या बातम्या