Home /News /technology /

या दिवशी लाँच होणार iPhone 14? किमतीबाबत मोठा खुलासा

या दिवशी लाँच होणार iPhone 14? किमतीबाबत मोठा खुलासा

iPhone 14 सीरिज नेमकी कधी लाँच होणार, भारतात याची किंमत काय असेल, काय फीचर्स असतील याबाबत अनेकांना उत्सुकता आहे. या वर्षी सप्टेंबरमध्ये iPhone 14 चे चार नवे वेरिएंट लाँच केले जातील.

  नवी दिल्ली, 16 मे : Apple दरवर्षी आपल्या फ्लॅगशिप स्मार्टफोनचं एक नवं मॉडेल लाँच करतं. यावर्षी iPhone 14 लाँच केला जाणार आहे. मागील कित्येक दिवसांपासून या फोनची चर्चा असून अनेक जणांच्या विशलिस्टमध्ये हा फोन असेल. ही iPhone 14 सीरिज नेमकी कधी लाँच होणार, भारतात याची किंमत काय असेल, काय फीचर्स असतील याबाबत अनेकांना उत्सुकता आहे. iPhone 14 सप्टेंबर 2022 लाँच केला जाणार असल्याची माहिती आहे. परंतु याची नेमकी तारीख समोर आलेली नाही. हा फोन सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात 8 ते 15 सप्टेंबरदरम्यान लाँच होऊ शकतो असा अंदाज आहे. या वर्षी सप्टेंबरमध्ये iPhone 14 चे चार नवे वेरिएंट लाँच केले जातील. यात iPhone 14, Phone 14 Pro, Phone 14 Max, Phone 14 Pro Max सामिल असतील. या सीरीजमध्ये iPhone 14 Mini लाँच केला जाणार नसल्याची चर्चा आहे. iPhone 14 Pro Max ची भारतातील किंमत काय असेल? एका टिप्स्टरने दिलेल्या माहितीनुसार, iPhone 14 च्या चारही मॉडेलच्या किंमतीचा खुलासा करण्यात आला आहे. या सीरिजचं टॉप मॉडेल iPhone 14 Pro Max 899 डॉलर म्हणजे भारतीय चलनानुसार जवळपास 70 हजार रुपयांपर्यंत असू शकतं. भारतात या फोनसाठी अधिक इम्पोर्ट ड्यूटी आणि जीएसटीही द्यावा लागू शकतो. त्यामुळे सर्व चार्जेजसह किमतीत वाढ होऊ शकते. मिळालेल्या माहितीनुसार, या सीरीजमधील बेसिक फोन iPhone 14 ची किंमत 60000 रुपयांजवळपास असेल. iPhone 14 Pro ची किंमत जवळपास 68000 रुपये असू शकते. iPhone 14 Pro Max ची किंमत 91000 रुपयांजवळपास असू शकते. रिपोर्ट्सनुसार, iPhone 14 सीरिजच्या प्रो मॉडेल्सचं डिझाइन मागच्या iPhone 13 हून वेगळं असू शकतं. iPhone 14 Pro Max मध्ये पुढच्या बाजूला डिस्प्लेमध्ये एक वाइड नॉच आणि मागच्या भागात दोन कॅमेरा सेंसर्स असू शकतात. ही सीरिज कोणत्या रंगात उपलब्ध होईल याबाबत कोणतीही माहिती सध्या उपलब्ध नाही.

  हे वाचा - Social Media वर अन-सोशल होण्याची गरज? मानसिक, शारीरिक आरोग्यावर असा होतोय परिणाम

  iPhone 14 Pro Max च्या रियर कॅमेरा सेटअपमध्ये दोन कॅमेरा सेंसर आणि एक फ्रंट कॅमेरा असू शकतो. या स्मार्टफोनच्या कॅमेराच्या सेंसरला iPhone 13 हून अधिक चांगला लो-लाइट कॅमेरा असू शकतो. फोनला A16 बायोनिक चिप असेल. तर 6.1 इंची डिस्प्ले असेल. या फोनला कमीत-कमी 128GB स्टोरेज आणि जास्तीत-जास्त 512GB स्टोरेज मिळू शकतं. या फोनची बॅटरी लाइफदेखील एकदा चार्ज करुन संपूर्ण दिवसभर वापरता येऊ शकतो अशी असू शकते. iPhone 13 च्या तुलनेत अधिक चांगली बॅटरी असू शकते.
  Published by:Karishma
  First published:

  Tags: Apple, Iphone, Mobile Phone, Tech news

  पुढील बातम्या