नवी दिल्ली, 2 मे : Apple चा iPhone अनेकांच्या विश लिस्टमध्ये (Apple iPhone 13) असतो. अनेकदा बजेटमुळे आयफोन खरेदी करता येत नाही. अनेक जण यासाठी एखाद्या सेल किंवा ऑफरची वाट पाहत असतात. तुम्हीही नवा काहीसा परवडणाऱ्या किमतीत iPhone घेण्याचा विचार करत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी फायद्याची ठरेल.
Apple iPhone 13 फ्लिपकार्टवर 74,850 रुपयांत उपलब्ध केला जात आहे, जो याच्या ओरिजनल किमतीहून 79,900 रुपयांहून 6 टक्के कमी (iphone 13 Flipkart Offer) आहे. iPhone 13 चं 128GB वेरिएंट 53,850 रुपयांत खरेदी करता येईल. ही ऑफर एक्सचेंज ऑफरद्वारे मिळेल. जर iPhone 13 वर मॅक्सिमम एक्सचेंज प्राइज अप्लाय झाल्यास हा फोन फ्लिपकार्टवर 16,000 रुपयांच्या सूटमध्ये मिळेल. एक्सचेंज ऑफरची किंमत तुमच्या जुन्या फोनवर अवलंबून असते. तुमचा फोन किती लेटेस्ट, कोणतं मॉडेल आहे यावर एक्सचेंज ऑफर ठरते. या ऑफरमध्ये कोणत्याही ब्रँडचा फोनचा एक्सचेंज करता येईल.
iPhone 13 ची फ्लिपकार्टवर खरी किंमत 74,850 रुपये आहे. तुमचा जुना फोन एक्सचेंज केल्यास 16000 रुपयांचा डिस्काउंट मिळेल. त्यानंतर याची किंमत 58,850 रुपये होईल. त्याशिवाय HDFC बँक कार्ड युजर्स iPhone 13 वर 5,000 रुपयांचा इन्स्टंट डिस्काउंट मिळवू शकतात. यानंतर iPhone 13 ची किंमत कमी होऊन 53,850 रुपये होते.
iPhone 13 काय आहेत फीचर्स -
iPhone 13 च्या 128GB वेरिएंटमध्ये A15 बायोनिक चिप देण्यात आली आहे. हा 5G स्मार्टफोन असून 6.1 इंची सुपर रेटिना एक्सडीआर डिस्प्ले आणि क्विक चार्जिंग सपोर्टसह येतो. यात एक डुअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यात दोन्ही सेंसर्स 12 मेगापिक्सलचे आहेत. तसंच फ्रंट कॅमेराही 12 मेगापिक्सलचा आहे. हा डुअल सीम स्मार्टफोन पाणी आणि धूळीत खराब होत नाही. फोनला IP68 रेटिंग मिळालं आहे.
Published by:Karishma
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.