Home /News /technology /

iPhone 12 Mini वर आतापर्यंतचा सर्वात मोठा डिस्काउंट, अशी मिळेल बंपर सूट

iPhone 12 Mini वर आतापर्यंतचा सर्वात मोठा डिस्काउंट, अशी मिळेल बंपर सूट

Big Bachat Dhamaal सेलमध्ये iPhone 12 आतापर्यंतच्या कमी किंमतीत खरेदी करण्याची संधी आहे. तुम्ही 5G iPhone घेण्याचा विचार करत असाल, तर चांगली संधी आहे.

  नवी दिल्ली, 7 जानेवारी : Flipkart वर बिग बचत धमाल सेल (Big Bachat Dhamaal) सुरू झाला आहे. हा सेल आज 7 जानेवारीपासून सुरू झाला असून 9 जानेवारीपर्यंत सुरू राहणार आहे. या सेलमध्ये अनेक प्रोडक्ट्सवर धमाकेदार डिस्काउंट दिला जात आहे. फ्लिपकार्टचा हा या वर्षाच्या सुरुवातीला पहिलाच सेल आहे. सेलमध्ये स्मार्टफोनवरही मोठा डिस्काउंट दिला जात आहे. Big Bachat Dhamaal सेलमध्ये iPhone 12 आतापर्यंतच्या कमी किंमतीत खरेदी करण्याची संधी आहे. तुम्ही 5G iPhone घेण्याचा विचार करत असाल, तर चांगली संधी आहे. iPhone 12 Mini ची लाँच प्राइज 59,900 रुपये आहे, परंतु सेलदरम्यान फोन 40,999 रुपयात उपलब्ध आहे. म्हणजेच फोनवर 31 टक्क्यांचा डिस्काउंट मिळतो आहे. त्याशिवाय अनेक बँक आणि एक्सचेंज ऑफर आहे, यामुळे फोनची किंमत आणखी कमी होते.

  Car Driving शिकायचं आहे?Maruti Suzukiने सुरू केले हे खास कोर्स, पाहा किती आहे फी

  iPhone 12 Mini वर Axis Bank 5 टक्के डिस्काउंट देत आहे. जर तुम्ही अॅक्सिस बँकेच्या क्रेडिट कार्डने पेमेंट केल्यास, तुम्हाला 2050 रुपयांचा डिस्काउंट मिळेल. म्हणजे फोनची किंमत 38,949 रुपये होईल. त्याशिवाय इतर एक्सचेंज ऑफरही आहे, ज्यामुळे फोनची किंमत आणखी कमी होते.

  WhatsApp वरुन डाउनलोड करा Corona Vaccine Certificate, पाहा सोपी प्रोसेस

  एक्सचेंज ऑफर - iPhone 12 Mini वर 15,450 रुपयांची एक्सचेंज ऑफर दिली जात आहे. जर तुम्ही जुना स्मार्टफोन एक्सचेंज केल्यास, 15,450 रुपयांचा डिस्काउंट मिळेल. पण 15,450 रुपयांची सूट तेव्हाच मिळेल, जर तुमचा जुना फोन चांगल्या कंडिशनमध्ये आणि लेटेस्ट मॉडेल असेल. जर संपूर्ण एक्सचेंज ऑफर मिळाली, तर फोनची किंमत 23,499 रुपये होईल.
  Published by:Karishma
  First published:

  Tags: Apple, Iphone, Tech news

  पुढील बातम्या