मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /

Apple लव्हर्ससाठी मोठी बातमी; iPhone 14 सीरिज लाँच केल्यावर भारतात 'या' मॉडेलवर भरघोस सूट!

Apple लव्हर्ससाठी मोठी बातमी; iPhone 14 सीरिज लाँच केल्यावर भारतात 'या' मॉडेलवर भरघोस सूट!

Apple iPhone 14 सीरिज 7 सप्टेंबर रोजी लॉन्च करण्यात आली होती. Apple ने iPhone 14 लाँच केल्यानंतर जुन्या iPhone मॉडेल्सच्या किंमती कमी केल्या आहेत.

Apple iPhone 14 सीरिज 7 सप्टेंबर रोजी लॉन्च करण्यात आली होती. Apple ने iPhone 14 लाँच केल्यानंतर जुन्या iPhone मॉडेल्सच्या किंमती कमी केल्या आहेत.

Apple iPhone 14 सीरिज 7 सप्टेंबर रोजी लॉन्च करण्यात आली होती. Apple ने iPhone 14 लाँच केल्यानंतर जुन्या iPhone मॉडेल्सच्या किंमती कमी केल्या आहेत.

  • Trending Desk
  • Last Updated :
  • Mumbai, India

नवी दिल्ली, 9 सप्टेंबर : अ‍ॅपलने (Apple) 7 सप्टेंबर रोजी कंपनीच्या फार आउट इव्हेंटमध्ये आपली iPhone 14 ची सीरिज लाँच केली. यामध्ये त्यांनी Apple Watch Series 8 आणि नवीन सेकंड-जनरेशन AirPods Pro देखील लाँच केलं. Apple iPhone 14 ची किंमत भारतात 79,900 रुपये असून, ती मागील वर्षी लाँच करण्यात आलेल्या आयफोन 13 इतकीच आहे. आता iPhone 14 लाँच केल्यामुळे, Apple ने भारतात iPhone 12 आणि iPhone 13 च्या किमती कमी केल्या आहेत आणि iPhone 11 बंद केला आहे.

गेल्या वर्षी लाँच करण्यात आलेल्या iPhone 13 च्या बेसिक 128GB स्टोरेज व्हॅरिएंटसाठी आता भारतातली किंमत 69,900 रुपये आहे. पुढच्या आठवड्यात Flipkart आणि Amazon फेस्टिव्ह सेल्समध्ये (festive sales) तुम्हाला iPhone 13 खूपच स्वस्तात मिळू शकेल. आयफोन 13 वर त्याच्या 79,900 रुपयांच्या स्टिकर प्राइसवर (sticker price) 10,000 रुपयांची सूट देण्यात आली आहे. Apple च्या अधिकृत वेबसाइटवरचा ट्रेड-इन ऑप्शन (trade-in option) वापरून युझर्स त्याची किंमत आणखी कमी करू शकतात.

दुसरीकडे, iPhone 12 ची किंमत आता 59,990 रुपये झाली आहे. या स्मार्टफोनच्या सुरुवातीच्या 79,900 रुपयांच्या किमतीवर आता जवळपास 20,000 रुपये सूट देण्यात आली आहे. आयफोन 12 अ‍ॅमेझॉनवर कमी किमतीत उपलब्ध आहे आणि आगामी फ्लिपकार्ट आणि अ‍ॅमेझॉन फेस्टिव्ह सेलमध्ये तुम्ही आयफोन 12 वर अजून चांगल्या ऑफर्स मिळवू शकता. Apple ने iPhone 12 Mini आणि iPhone 13 Mini देखील बंद केले आहेत. iPhone 14 सीरिजमध्ये Apple ने “मिनी” iPhone आणलेला नाही. त्याऐवजी कंपनीने आयफोन 14 प्लस (iPhone 14 Plus) आणला असून, तो मोठ्या स्क्रीनसह उपलब्ध असेल.

वाचा - तब्बल 8 हजारांनी स्वस्त मिळतोय 108MP कॅमेरा असलेला ‘हा’ स्मार्टफोन, वाचा फीचर्स

Apple iPhone 14 सीरिज 7 सप्टेंबर रोजी रात्री Apple च्या फार आउट इव्हेंटमध्ये लाँच करण्यात आली. या सीरिजमधल्या फोनमध्ये अनेक नवीन अपडेट्स आणि फीचर्स देण्यात आली आहेत. आयफोन 14 प्लस हे लाइनअपमधलं एक नवीन डिव्हाइस आहे आणि त्याची वैशिष्ट्यं व्हॅनिला आयफोन 14 सारखीच आहेत. फक्त त्यामध्ये 6.7-इंचाचा मोठी डिस्प्ले देण्यात आला आहे. iPhone 14 Plus हा आयफोन 12 (iPhone 12) आणि आयफोन 13 (iPhone 13) सीरिजमध्ये आलेल्या “मिनी” आयफोनला रिप्लेस करणार आहे.

Apple iPhone 14 Pro आणि iPhone 14 Pro Max नवीन बदललेल्या डिझाइनसह येत आहे. नवीन प्रीमियम आयफोन मॉडेल्सची शेवटी नॉचपासून सुटका झाली असून, त्याऐवजी आता हा पिल शेप्ड होल पंच सेटअपसह येईल. त्याला Apple डायनॅमिक आयलँड (Dynamic Island) म्हटलं जातंय.

First published:

Tags: Apple, Iphone