नवी दिल्ली, 13 मार्च : स्मार्टफोन युजर्समध्ये अॅपल (Apple) कंपनीच्या आयफोन्सची (iPhones) विशेष क्रेझ आहे. तसंच आयफोन्सचा वापर करणारा विशिष्ट असा वर्ग आहे. त्यामुळे आयफोनच्या चाहत्यांसाठी ही विशेष बातमी म्हणावी लागेल. आयफोन 12 चं (iPhone 12) असेंब्ल (Assembly) किंवा उत्पादन आता भारतात सुरू झालं आहे. कंपनीने जगातील दुसऱ्या क्रमांकाची स्मार्टफोनची बाजारपेठ समजल्या जाणाऱ्या देशात आता iPhone 12 चं उत्पादन सुरू केले असल्याचं अमेरिकी तंत्रज्ञांनी सांगितलं. आमच्या स्थानिक ग्राहकांसाठी आम्ही भारतात iPhone 12 चं उत्पादन सुरू केलं असून याचा आम्हाला अभिमान असल्याचं या तंत्रज्ञांनी सांगितलं. स्मार्टफोन पुरवठादाराचं नाव न घेता अॅपलने याबाबत गुरुवारी निवेदन जारी केलं.
अॅपलच्या तैवानी कराराची निर्माती कंपनी असलेल्या फॉक्सकॉनच्या (Foxconn) भारतातील तामिळनाडू प्लॅंटमध्ये या डिव्हाईसची जुळवणी करण्यात येणार असल्याची माहिती यात सहभागी दोन सूत्रांनी दिली. अॅपल वॉशिंग्टन (Washington) आणि बिजिंग (Beijing) दरम्यानच्या व्यापार युध्दाला नेव्हिगेट करत असल्याने चीनमधील काही उत्पादन इतर बाजारपेठांकडे वळवण्यात आलं आहे. नोव्हेंबरमध्ये या प्रकरणाशी निगडीत एका व्यक्तीनं सांगितलं की, फॉक्सकॉनच्या विनंतीवरुन काही आयपॅड आणि मॅकबुकच्या जुळणीची कामं चीनवरुन व्हिएतनामला (Vietnam) हलवण्यात आली आहे.
कर्पेतिनो, कॅलिफोर्निया हे मुख्यालय असलेल्या अॅपल कंपनीने 2017 मध्ये भारतात तैवानची पुरवठादार कंपनी विस्ट्रॉनमार्फत आयफोन असेंब्ली सुरू केली आहे. फॉक्सकॉन, विन्स्ट्रॉन (Winstron) आणि तिसरी पुरवठादार कंपनी पेगाट्रॉन यांनी एकत्रितपणे येत्या पाच वर्षात आयफोन निर्मितीतून सुमारे 900 दशलक्ष डॉलर्स उलाढालीचं उदिदष्ट ठेवलेलं आहे. तसंच नवी दिल्लीच्या योजनेतून स्मार्टफोन निर्यातीतून 6.7 अब्ज डॉलर्स नफा मिळवण्याचं उदिदष्ट ठेवलं आहे.
रॉयटर्सच्या वृत्तानुसार, अॅपल आपल्या आयपॅड टॅब्लेटची असेंब्ली भारतात आणण्याच्या विचारात आहे. भारतात iPhone 12 च्या उत्पादनाच्या बातमीनंतर केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद (Ravi Shankar Prasad) यांनी भारताला मोबाईल आणि पार्टसचं उत्पादन केंद्र बनवण्याचे आमचे प्रयत्न जागतिक स्तरावर लक्ष वेधून घेत आहेत, याचा आनंद होत असल्याचं ट्विट केलं होतं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: India, Iphone, Smartphone, Tech news, Technology