Apple iPhone 11 काही तासांत होणार लाँच; ही असेल किंमत

iPhone 11 च्या नव्या सीरिजमध्ये तीन आयफोन सादर करण्यात येणार आहेत. एका चायनीज वेबसाईटने लीक केलेल्या माहितीनुसार नव्या आयफोनची किंमत परवडणारी असू शकते.

News18 Lokmat | Updated On: Sep 10, 2019 08:46 PM IST

Apple iPhone 11 काही तासांत होणार लाँच; ही असेल किंमत

मुंबई, 10 सप्टेंबर : Apple चा नवा iPhone काही तासांत लाँच होणार आहे. iPhone 11 च्या नव्या सीरिजमध्ये तीन आयफोन सादर करण्यात येणार आहेत. याची किंमत किती असेल याची चर्चा सुरू आहे. एका चायनीज वेबसाईटने लीक केलेल्या माहितीनुसार iPhone 11 ची किंमत परवडणारी असू शकते.

आयफोन11 च्या मध्यरात्री रीलिज होणाऱ्या सीरिजमध्ये iPhone 11 Pro, iPhone 11 Pro Max हे फोन लाँच होतील. अॅपलचे प्रमुख टिम कुक हे फोन सादर करतील. त्याची किंमत काय असेल याची माहिती Weibo या चायनीज सोशल मीडिया नेटवर्कने उघड केली आहे.

आयफोनची अमेरिकेतली किंमत या नेटवर्कने लीक केली आहे. वेबोने दिलेल्या माहितीनुसार आयफोन 11 ची नवी सीरिज $749 (अमेरिकन डॉलरपासून)पासून सुरू होईल. म्हणजे साधारण 53,800 रुपयांत iPhone 11 मिळू शकेल. आयफोन प्रो मॅक्सची किंमत सर्वाधिक म्हणजे 1,099 अमेरिकन डॉलर इतकी असेल. iPhone 11 Pro Max ची भारतीय रुपयांमध्ये किंमत साधारण 79,000 च्या आसपास असण्याची शक्यता आहे. या दोन मॉडेल्सच्या मधलं मॉडेल असेल आयफोन प्रो. त्याची किंमत 999 डॉलर म्हणजे 72000 रुपये असण्याची शक्यता आहे.

भारतात कधी मिळणार

प्रसिद्ध झालेल्या काही बातम्यांनुसार भारतात 20 सप्टेंबरपासून आयफोन 11 विक्रीसाठी उपलब्ध होतील.

Loading...

हे वाचा - Paytm वरून मिळवा 2100 रुपये कॅशबॅक, कंपनीनं दिलीय 'ही' ऑफर!

तिन्ही नव्या सीरिज भारतात उपलब्ध असणार आहेत.

ही आहेत फीचर्स

आयफोन 11 तीन प्रकारांत उपलब्ध असेल. आधीच्या सीरिजप्रमाणेच स्टोरेजच्या हिशोबाने हे प्रकार असतील आणि अधिक मेमरी स्टोरेज असलेला फोन महाग असेल. 64GB, 128GB आणि 256GB या तीन व्हेरिअंटमध्ये आयफोन11 उपलब्ध असेल. या सगळ्या फोनला 12 मेगापिक्सेल सेन्सर कॅमेरा असणार आहे. iPhone Pro आणि iPhone Pro Max या फोनला 12-megapixel sensors सह वेगवेगळ्या फोकल लेन्थ असतील. iPhone 11 ला मात्र फक्त 12-megapixel sensors सह रेग्युलर लेन्स असेल आणि टेलिफोटो लेन्स सर्व फोनमध्ये असेल.

हे वाचा - CamScanner मध्ये आला होता व्हायरस, तुम्ही अपडेट केलंत का?

या साईटने दिलेल्या या किंमती गेल्या वर्षी लाँच झालेल्या आयफोनएवढ्याच दिसत आहेत. आता ही माहिती खरी ठरली तर भारतातही परवडणाऱ्या किंमतीत नवा आयफोन उपलब्ध असेल. भारतात परकीय गुंतवणुकीविषयी नियम शिथिल होण्याच्या बेतात आहेत. तसं झालं तर iPhone ची भारतातली किंमत आणखी कमी होऊ शकते.

SPECIAL REPORT : राष्ट्रवादीला आतापर्यंतचा सर्वात मोठा झटका, तब्बल 55 नगरसेवक भाजपात दाखल होणार!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 10, 2019 08:46 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...