• Home
 • »
 • News
 • »
 • technology
 • »
 • Alert : पुढचे २ दिवस इंटरनेट होऊ शकतं बंद; बँकेचे व्यवहार अडकण्याची शक्यता

Alert : पुढचे २ दिवस इंटरनेट होऊ शकतं बंद; बँकेचे व्यवहार अडकण्याची शक्यता

जगभरातलं इंटरनेट पुढचे ४८ तास बंद होऊ शकतं. यामुळे तुमची अनेक कामं खोळंबू शकतात. सायबर अटॅकच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने इंटरनेटचं असं ग्लोबल शटडाउन करण्याची गरज निर्मण झाली आहे.

 • Share this:
  मुंबई : जगभरातील इंटरनेट सेवा पुढील 48 तासांसाठी बंद होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मेन डोमेन सर्व्हर आणि आणि संबंधित नेटवर्क इन्फ्रास्ट्रक्चर काही काळासाठी बंद राहणार आहे. त्यामुळे इंटरनेट सेवेमध्ये अडथळा येईल, असं वृत्त रशिया टुडे या दैनिकानं दिलं आहे. इंटरनेट सेवा बंद केल्यानंतर ‘द इंटरनेट कॉर्पोरेशन ऑफ असाइन्ड अँड नंबर्स’ (ICANN) कडून मेंटनन्सचे काम करण्यात येईल.  ICANN हे क्रिप्टोग्राफिकची की (Key) बदलणार आहे, तसंच इंटरनेट की (Key) अॅड्रेस बुक किंवा डोमेन नेम सिस्टमला प्रोटेक्ट करेल. का आहे इंटरनेट ग्लोबल शटडाउनची गरज? सायबर अटॅकच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने इंटरनेट शटडाउन करण्याची गरज निर्माण झाली, असं ICANN कडून सांगण्यात आलंय. तर कम्युनिकेशन्स रेग्युलेटरी ऑथोरिटीने म्हटलंय की, स्थिर DNS साठी ग्लोबल इंटरनेट शटडाउन गरजेचं आहे. इंटरनेटचा वापर करणाऱ्यांना पुढच्या 48 तासांमध्ये वेबपेजपर्यंत पोहोचण्यासाठी आणि ऑनलाईन ट्रान्झॅक्शनमध्ये अडचणी येऊ शकतात. अडचण आल्यास काय कराल? जर तुमच्या लॅपटॉपवर किंवा संगणकावर वेबसाईट किंवा वेबपेज उघडायला अडचणी येत असतील तर तुम्ही तुमच्या घरातील राउटर बंद करुन पुन्हा सुरू करा. त्यानंतरही जर तुम्ही वेबसाईटवर पोहचू शकत नसाल तर याचा अर्थ तुमची इंटरनेट कंपनी अजूनही जुन्याच DNS चा वापर करत आहे. VIDEO : 'SHIVDE I AM SORRY' नंतर पिंपरीत 'स्मार्ट बायका कुठे जातात'चं पोस्टर व्हायरल      
  First published: