Jio, Airtel, Vodafone-Idea : 450 रुपयांपेक्षा कमी रिचार्जवर दररोज 2GB डेटा

Jio, Airtel, Vodafone-Idea : 450 रुपयांपेक्षा कमी रिचार्जवर दररोज 2GB डेटा

सध्या दररोज दीड जीबी इंटरनेटचा प्लॅन जवळपास प्रत्येक कंपनी देते. त्याशिवाय जास्त डेटासाठी वेगळे प्लॅन कंपन्यांकडून दिले जात आहेत.

  • Share this:

Jio लाँच झाल्यानंतर कॉलिंग, इंटरनेटचे दर कमी झाले. जिओनंतर इतर सर्वच कंपन्यांनी नेटचे दर कमी केले. आता सर्वच कंपन्यांच्या दरात वाढ झाली आहे. दरम्यान, यातही कंपन्यांनी ग्राहकांसाठी काही खास प्लॅन आणले आहेत. सध्या दररोज दीड जीबी इंटरनेटचा प्लॅन जवळपास प्रत्येक कंपनी देते. त्याशिवाय जास्त डेटासाठी वेगळे प्लॅन कंपन्यांकडून दिले जात आहेत.

Vodafone

व्होडाफोन आयडियाने नुकताच 449 रुपयांचा प्लॅन लाँच केला आहे. 56 दिवसांच्या व्हॅलिडिटीच्या या प्लॅनमध्ये युजर्सना दररोज 2 जीबी डेटा दिला जात आहे. या प्लॅनमध्ये देशभरात कोणत्याही नेटवर्कवर फ्री कॉल आणि दररोज 100 एसएमएस दिले जात आहेत.

Airtel

एअरटेलनेसुद्धा व्होडाफोनप्रमाणेच 449 रुपयांचा प्लॅन दिला आहे. त्यात मिळणाऱ्या सुविधाही तशाच आहेत. दररोज 2 जीबी डेटा आणि 100 फ्री एसएमएस मिळणार आहेत. कंपनीने यासोबत विंक म्यूझिक आणि एअरटेल एक्सट्रीम प्रीमियम सर्विसचा अॅक्सेसही मिळतो.

Reliance Jio

जिओ कंपनीने 444 रुपयांचा प्लॅन लाँच केला आहे. यात 56 दिवसांसाठी दररोज 2 जीबी हायस्पीड इंटरनेट डेटा दिला जात आहे. डेटा लिमिट संपल्यानंतर 64kbps च्या स्पीडने इंटरनेट वापरायला मिळणार आहे. तसेच जिओ नेटवर्कसाठी अनलिमिटेड कॉलिंग आणि इतर नेटवर्कवर 2000 मिनिटे कॉलिंग मिळणार असून जिओ अॅप्सचे सबस्क्रीप्शनही फ्री दिलं जाणार आहे.

वाचा : Jio, Vodafone, airtel चे बेस्ट प्लॅन, 149 रुपयांमध्ये मिळणार 'या' सुविधा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 16, 2020 06:19 PM IST

ताज्या बातम्या