मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /

Instagram आता IGTV ला करणार अलविदा, या फीचरमधून अपलोड करता येणार Video; वाचा सविस्तर

Instagram आता IGTV ला करणार अलविदा, या फीचरमधून अपलोड करता येणार Video; वाचा सविस्तर

इन्स्टाग्राम आपल्या IGTV App ला रिब्रँड करणार आहे. IGTV आता Instagram Video नावाने नव्या फॉर्मेटसह लाँच होणार आहे. IGTV आणि फीड व्हिडीओ आता Instagram प्लॅटफॉर्मवरुन हटवण्यात आले आहेत.

  नवी दिल्ली, 7 ऑक्टोबर : Instagram एक नवा व्हिडीओ टॅब लाँच करण्याच्या तयारीत आहे. इन्स्टाग्राम आपल्या IGTV App ला रिब्रँड करणार आहे. IGTV आता Instagram Video नावाने नव्या फॉर्मेटसह लाँच होणार आहे. या लाँचसह IGTV आणि फीड व्हिडीओ आता Instagram प्लॅटफॉर्मवरुन हटवण्यात आले आहेत. IGTV आणि फीड व्हिडीओ मर्ज करुन Instagram Video बनवला आहे. यामुळे व्हिडीओ कंटेंट शोधण्यास युजर्सला सोपं होणार आहे. युजर्सला Instagram Video या नव्या फीचरमधून व्हिडीओ अपलोड करता येतील. या नव्या फीचरसह कंपनीने व्हिडीओ एडिट करण्यासाठीही अनेक ऑप्शन्स दिले आहेत. यात व्हिडीओ ट्रिम करता येऊ शकतो. त्याशिवाय व्हिडीओमध्ये फिल्टरही टाकता येऊ शकतो. व्हिडीओमध्ये लोकांना टॅगही करता येऊ शकतं. या फीचरद्वारे युजर्स मोठे व्हिडीओ आणि पाहू आणि शेअरही करू शकतील.

  Instagram Post डिलीट झाली? सोप्या पद्धतीने अशी करता येईल रिकव्हर

  Instagram बिजनेस आणि क्रिएटर्ससाठी Feed Post Insights आणि Video Insights देखील मर्ज केलं जात आहे. युजर्स, व्हिडीओ होम पेजच्या उजव्या बाजूला असलेल्या प्लसवर टॅप करुन अपलोड करू शकतात. 60 मिनिटांपर्यंतचा व्हिडीओ फीडमध्ये पोस्ट करता येईल.

  ऑनलाइन ऑर्डर केली पॉवर बँक, घरी आली विट; अनेकांनी शेअर केला खरेदीचा भयंकर अनुभव

  त्याशिवाय IGTV Ads फीचरही कंपनी अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी काम करत आहे. बिजनेससाठी बनवण्यात येणाऱ्या व्हिडीओला सध्या मॉनिटाइज केलं जात आहे, ज्यामुळे बिजनेस ब्रँड्स ऑडियन्सपर्यंत सहजपणे पोहोचू शकतील. Instagram वर व्हिडीओ पाहताना युजर्स कुठेही टॅप करुन फुल-स्क्रिन मोडमध्ये जाऊ शकतात. स्क्रोल करुन इतरही व्हिडीओ पाहता येतात. या बदलावामुळे Reels वर परिणाम होणार नसल्याचं कंपनीकडून सांगण्यात आलं आहे.
  Published by:Karishma
  First published:

  Tags: Instagram, Instagram post

  पुढील बातम्या