• Home
 • »
 • News
 • »
 • technology
 • »
 • Instagram लव्हर्ससाठी धक्कादायक बातमी! या वर्षाअखेरीस बंद होणार हे भन्नाट फीचर?

Instagram लव्हर्ससाठी धक्कादायक बातमी! या वर्षाअखेरीस बंद होणार हे भन्नाट फीचर?

Instagram वरील Threads Features बंद करण्याचा निर्णय इन्स्टाग्रामने घेतला आहे. त्यामुळं आता यापुढे या फीचर्सचा (instagram discontinue threads features) लाभ युजर्सला घेता येणार नाही.

 • Share this:
  नवी दिल्ली, 20 नोव्हेंबर : प्रसिद्ध फोटो शेयरिंग अ‍ॅप इन्स्टाग्रामने एक जबरदस्त फीचर बंद करण्याचा निर्णय घेतल्यानं इन्स्टाग्राम युजर्सला चांगलाच धक्का बसला आहे. कारण आता Instagram वरील Threads Features बंद करण्याचा निर्णय इन्स्टाग्रामने घेतला आहे. त्यामुळं यापुढे या फीचर्सचा (instagram discontinue threads features) लाभ युजर्सला घेता येणार नाही. स्नॅपचॅटमध्येही देण्यात आलेल्या या सेम टू सेम या फीचर्सला इन्स्टाग्रामने 2019 मध्ये लॉन्च केलं होतं. आता याच्या बंद होण्याच्या नोटिफिकेशन्स Instagram युजर्सला पुढच्या आठवड्यापासून (instagram update today) मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळं आता इन्स्टाग्राम या फीचर्सच्या जागी दुसरं फीचर्स आणण्याच्या तयारीत असल्याचं बोललं जात आहे. त्यात युजर्सला फीड स्टोरीत Music Add करता येणार आहे.

  2024 मध्ये चार्जर नसलेले स्मार्टफोन येणार बाजारात? पाहा काय आहे योजना...

  TechCrunch ने दिलेल्या रिपोर्टनुसार या वर्षाअखेरीस इन्स्टाग्रामचं हे फीचर बंद करण्यात येईल. 23 नोव्हेंबरपासून युजर्सला त्याचं नोटिफिकेशन मिळणार आहे. या फीचर्सद्वारे युजर्सला फोटोज आणि Visuals मित्रांबरोबर (new instagram story features) शेयर करता येत होतं. या फीचर्सला का बंद करण्यात येत आहे. याचं कारण अजून कंपनीनं सांगितलेलं  नाही. त्यामुळं आता या फीचर्सच्या बंद होण्यामुळं युजर्सला मात्र मोठा धक्का बसला आहे.

  आता प्रत्यक्षात येतेय हवेत उडणारी कार, भारतीय तंत्रज्ञाचाही हातभार

  नव्या फीचर्सची असणार सुविधा... आता या फीचर्सच्या बंद होण्यानंतर फीड स्टोरीत Music Add करता येणाऱ्या फीचर्सवर (instagram threads features and functions) इन्स्टाग्राम काम करत आहे. त्यामुळं आता युजर्सला याचा फायदा होईल. त्याचबरोबर त्यात लायब्ररीतील आणि काही लाईव्ह Music Add करता  येणार आहे.

  कारमध्ये हेडफोनशिवाय ऐकता येणार Music; तरीही दुसऱ्यांना होणार नाही डिस्टर्ब

  Instagram वर Multiple अकाउंट तयार करणं होणार कठीण? इन्स्टाग्रामवर आता एकापेक्षा अधिक अकाउंट्स तयार करणं कठीण होणार आहे. कारण आता त्याची प्रोसेस आणखी अवघड होणार आहे. आता युजर्सला अकाउंट ओपन करण्यासाठी काही पुरावे द्यावे लागणार आहेत. त्यात जर संदिग्धता आढळली तर अकाउंट ओपन होणार नाही. त्यात काही युजर्सला त्यांचे चेहरे दाखवून Video Selfie सबमिट करावी लागणार आहे. त्यामुळं फेक अकाउंट्सचंही प्रमाण कमी करता येणार आहे.

  धक्कादायक! फेसबुकद्वारे पाकिस्तानी हॅकर्स लोकांना करतायंत टार्गेट?

  सोशल मीडिया कन्सल्टंट मॅट नवारा यांनी याविषयी काही स्क्रिनशॉट शेयर केले असून त्यात लिहिलं आहे की आता इन्स्टाग्रामवर अकाउंट ओपन करण्यासाठी Video Selfie सबमिट करावी लागणार आहे. त्याद्वारे इन्स्टाग्राम युजर्सचा बायोमेट्रिक डेटा कलेक्ट करणार नसल्याचंही त्यांनी सांगितलं आहे. त्यामुळं या दोन्ही फिचर्सचा फायदा युजर्सला होणार आहे.
  Published by:Atik Shaikh
  First published: