मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /

Instagram युजर्ससाठी मोठी बातमी! एका फीचरचा वापर करून कमाईची संधी

Instagram युजर्ससाठी मोठी बातमी! एका फीचरचा वापर करून कमाईची संधी

Instagram लवकरच आपल्या क्रिएटर्ससाठी नवा बोनस पेमेंट प्रोग्राम जारी करू शकते. हे नवं फीचर Reels मध्ये सामिल केलं जाईल. ज्याद्वारे युजर्सला रिल्सच्या वापरानंतर पैसे कमावण्याची संधी मिळेल.

  • Published by:  Karishma

नवी दिल्ली, 27 मे : इन्स्टाग्राम युजर्ससाठी एक चांगली बातमी आहे. Instagram लवकरच आपल्या क्रिएटर्ससाठी नवा बोनस पेमेंट प्रोग्राम जारी करू शकते. हे नवं फीचर Reels मध्ये सामिल केलं जाईल. ज्याद्वारे युजर्सला रिल्सच्या वापरानंतर पैसे कमावण्याची संधी मिळेल.

बोनस प्रोग्राममध्ये भाग घेण्यासाठी इन्स्टाग्राम युजर्सला नवीन रिल्स शेअर करुन ते जास्तीत-जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी सांगू शकतं. मीडिया रिपोर्ट्सनुसार, Instagram प्लॅटफॉर्मवर नवे Reels शेअर करण्यासाठी क्रिएटर्सला पेमेंट देईल. आणखी एका रिपोर्ट्सनुसार, एका खास एंगेजमेंटपर्यंत पोहोचल्यानंतरच क्रिएटर्सला रिवॉर्ड दिले जातील.

फेसबुकच्या मालकीची कंपनी असलेल्या इन्स्टाग्रामने Reels and IG Live साठी इनसाइट्सची घोषणा केली आहे. हे नवं टूल अपडेटद्वारे जारी होईल. यामुळे क्रिएटर्स आणि बिजनेसला त्यांच्या कंटेंटपर्यंत पोहोच मिळेल. ज्यामुळे प्लॅटफॉर्मवर आवश्यक डेटा प्रदान करुन त्यांचा परफॉर्मेंस समजून घेणं आणि त्याचं मूल्यांकन करणं सोपं होईल.

(वाचा - नवीन नियमांचं पालन करण्याचा स्टेटस रिपोर्ट त्वरित सादर करण्याचे केंद्राचे आदेश)

या नव्या फीचरबाबत सर्वात आधी iOS डेव्हलपर Alessandro Paluzzi यांनी माहिती दिली. त्यांना काही बँक एन्ड कोड शोधत असताना या फीचरबाबत माहिती मिळाली. डेव्हलपरने काही स्क्रिनशॉट शेअर केले आहेत. Instagram आपल्या क्रिएटर्सला प्रोत्साहन देण्यासाठी Reels वर बोनस देण्याची योजना आखत आहे.

(वाचा - खरंच सरकार तुमचे WhatsApp कॉल, मेसेज चेक करणार?वाचा त्या व्हायरल मेसेजमागचं सत्य)

त्याशिवाय, Instagram लवकरच डेस्कटॉपवरही इनसाइट्सची सुविधा सुरू करेल. पब्लिक अकाउंट एक्सप्लोर स्पेसद्वारे मोठ्या इन्स्टाग्राम कम्युनिटीमध्ये Reels शेअर करता येतील. या फीचरद्वारे इन्स्टाग्रामच्या क्रिएटिव्हिटीमध्ये अतिशय वाढ झाली आहे. नवा बोनस प्रोग्राम क्रिएटर्सला सतत या अॅपशी कनेक्ट राहण्यासाठी मदत करण्याचा एक चांगला मार्ग आहे.

First published:

Tags: Instagram, Instagram post, Tech news