• Home
 • »
 • News
 • »
 • technology
 • »
 • आता Instagram Reels मध्ये मिळणार भन्नाट फीचर्स, आपल्या आवाजाचा करता येणार वापर

आता Instagram Reels मध्ये मिळणार भन्नाट फीचर्स, आपल्या आवाजाचा करता येणार वापर

इन्स्टाग्राम टिकटॉक इन्स्पायर्ड फीचर टेक्स्ट-टू-स्पीच आणि व्हॉईस इफेक्ट जोडणार आहे.

 • Share this:
  नवी दिल्ली, 13 नोव्हेंबर : फोटो शेअरिंग App Instagram ने नव्या आणखी एका नव्या फीचरची घोषणा केली आहे. इन्स्टाग्राम टिकटॉक इन्स्पायर्ड फीचर टेक्स्ट-टू-स्पीच आणि व्हॉईस इफेक्ट जोडणार आहे. Instagram च्या टेक्स्ट-टू-स्पीच (Text to Speech Feature) फीचद्वारे युजर्सला व्हिडीओमध्ये आपल्या आवाजाचा उपयोग करण्याची सुविधा मिळेल. इन्स्टाग्रामने व्हॉईस इफेक्टही (Voice Effect Feature) जोडले आहेत. या नव्या फीचरमुळे आता वेगवेगळ्या आवाजांसह व्हिडीओ बनवणं अधिक मजेशीर होईल. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, रील बनवण्यासाठी व्हॉईस आणि ऑडिओचा उपयोग महत्त्वाचा ठरतो. हेच पाहता इन्स्टाग्राम नवे ऑडिओ व्हॉईस इफेक्ट आणि टेक्स्ट-टू-स्पीच हे टूल लाँच करणार आहे. iOS आणि Android युजर्ससाठी इन्स्टाग्रामवर हे नवं फीचर रोलआउट केलं जाणार आहे. टेक्स्ट-टू-स्पीच फीचरमध्ये नवा टेक्स्ट जोडण्यासाठी टेक्स्ट जोडावा लागेल. एकदा क्लिपमध्ये टेक्स्ट जोडल्यानंतर कंपोजर स्क्रिनखाली टेक्स्टवर क्लिक करावं लागेल. त्यानंतर तीन डॉट्स मेन्युमधून टेक्स्ट-टू-स्पीच निवडावा लागेल.

  आता YouTube व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसणार नाही 'ही' गोष्ट: झाला मोठा बदल

  दरम्यान, Instagram ने आणखी एक फीचर लाँच करण्याची घोषणा केली आहे. Instagram आपल्या युजर्सला App च्या सततच्या वापारापासून रोखण्यासाठी एका नव्या फीचरचं टेस्टिंग करत आहे. 'Take a Break' नावाचं हे फीचर युजर्सला फोटो शेअरिंग App इन्स्टाग्रामच्या वापरादरम्यान नियमित ब्रेक घेण्यासाठी प्रोत्साहित करेल. इन्स्टाग्रामचे प्रमुख अ‍ॅडम मोसेरी (Adam Mosseri) यांनी दिलेल्या माहितीनुसार, टेक अ ब्रेक फीचर एखाद्या युजरला तो किती वेळापासून Instagram चा वापर करत आहे, हे सांगेल.

  Instagram वर सतत स्क्रोलिंग करता? आता अधिक वापर केल्यास मिळणार अलर्ट

  हे फीचर युजरला निश्चित वेळेत 10, 20 किंवा 30 मिनिटांत्या सततच्या वापरानंतर ब्रेक घेण्यासाठी प्रोत्साहित करेल. हे फीचर सध्या टेस्टिंगमध्ये आहे. मोसेरी यांनी Take a Break फीचर युजर्ससाठी येत्या डिसेंबरपर्यंत लाँच होण्याचं म्हटलं आहे.
  Published by:Karishma
  First published: