मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /

जबरदस्त! Instagram चं नवं फिचर, तीन महिन्यांपूर्वीच करता येणार Insta Live शेड्यूल

जबरदस्त! Instagram चं नवं फिचर, तीन महिन्यांपूर्वीच करता येणार Insta Live शेड्यूल

तुम्ही 30 दिवसांपर्यंत डिलीट झालेला कंटेंट Recently Deleted फोल्डरमधून परत मिळवू शकता. तसंच कंटेंट कायमसाठी डिलीट करण्याचाही पर्याय मिळतो.

तुम्ही 30 दिवसांपर्यंत डिलीट झालेला कंटेंट Recently Deleted फोल्डरमधून परत मिळवू शकता. तसंच कंटेंट कायमसाठी डिलीट करण्याचाही पर्याय मिळतो.

या नवीन फीचरमुळे युझर्स आपलं लाइव्ह स्ट्रीम (Insta live stream) हे एक तास ते 90 दिवस अगोदरच शेड्यूल (Schedule Insta live) करून ठेवू शकणार आहेत. तसंच, याचा रिमाइंडरही युझर्सना मिळणार आहे.

नवी दिल्ली, 29 नोव्हेंबर: आपल्या युझर्सच्या सोयीसाठी इन्स्टाग्राम नेहमीच नवनवीन फीचर्स (Instagram new features) लाँच करत असतं. या वर्षी इन्स्टाग्रामने रील्स रीमिक्स, लिंक्ससाठी नवीन स्टिकर्स, सामान्यांनाही बिझनेस आणि सेलेब्रिटीजप्रमाणे स्टोरीमध्ये लिंक अ‍ॅड करण्याची सुविधा आणि शॉपिंग अशी बरीच नवीन फीचर्स आपल्या युझर्सना दिली आहेत. यातच आता इन्स्टाग्राम (Instagram) आपल्या युझर्सना आणखी एक नवीन फीचर देणार आहे. या नवीन फीचरमुळे युझर्स आपलं लाइव्ह स्ट्रीम (Insta live stream) हे एक तास ते 90 दिवस अगोदरच शेड्यूल (Schedule Insta live) करून ठेवू शकणार आहेत. तसंच, याचा रिमाइंडरही युझर्सना मिळणार आहे.

या फीचरमुळे तीन महिन्या आधीपासूनच तुमच्या इव्हेंटची जाहिरात करणं शक्य होणार आहे. तसंच, लाइव्ह इव्हेंटच्या 24 तास अगोदर आणि 15 मिनिटं अगोदर असे रिमाइंडर्स (Insta live reminders) युझर्सना मिळणार आहेत. तुम्हालाही आपला लाइव्ह इव्हेंट असाच शेड्यूल (Schedule insta live event) करायचा असेल, तर त्यासाठी कोणत्या स्टेप्स फॉलो करायच्या याबाबत आम्ही तुम्हाला माहिती सांगणार आहोत. 'बीजीआर' या वेबसाइटने याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे.

इन्स्टाग्राम अ‍ॅप उघडल्यानंतर आपल्या फीडमधून राइट स्वाइप करा. त्यानंतर खाली दिलेल्या पर्यायांमधून स्क्रोल करून ‘लाइव्ह’ (Instagram Live) हा पर्याय निवडा. यानंतर डाव्या बाजूला असलेल्या पर्यायांमधून शेड्यूल हा पर्याय निवडा. यानंतर तुम्ही व्हिडिओचं टायटल आणि लाइव्ह ब्रॉडकास्ट सुरू करण्याचा वेळ (Instagram live broadcast schedule) याबाबत माहिती भरा. हे सगळं झाल्यानंतर शेड्यूल लाइव्ह व्हिडिओ या पर्यायावर क्लिक करा. अशा प्रकारे तुमचं लाइव्ह ब्रॉडकास्ट शेड्यूल करता येईल.

हेही वाचा-  WhatsApp वर Video Status असं करा डाउनलोड; पाहा प्रोसेस

 एकदा हे ब्रॉडकास्ट शेड्यूल झाल्यानंतर तुम्हाला त्याच्या वेळेत बदल करायचा असेल, तर त्याचा पर्यायही इन्स्टाग्रामने दिला आहे. यासाठी तुम्हाला ब्रॉडकास्ट शेड्यूल करण्यासाठीच्या पहिल्या दोन स्टेप्स फॉलो करायच्या आहेत. त्यानंतर ‘शेड्यूल ब्रॉडकास्ट’ (Schedule broadcast on Insta) या पर्यायासमोरच्या तीन डॉट असणाऱ्या आयकॉनवर क्लिक करून तुम्ही ठरलेल्या वेळेत बदल करू शकता. काही अडचण असल्यास ठरलेलं लाइव्ह शेड्यूल कॅन्सल करण्याचा पर्यायही इन्स्टाग्रामने ठेवला आहे.

हेही वाचा- Smart TV घेताय? खरेदीवेळी या महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवाच

दरम्यान, इन्स्टाग्रामसाठी आपण ‘टेक अ ब्रेक’ (Take a Break on Insta) नावाचंही एक फीचर टेस्ट करत असल्याची माहिती कंपनीचे सीईओ अ‍ॅडम मोस्सेरी (Instagram CEO) यांनी दिली आहे. इन्स्टाग्रामचं व्यसन लागलेल्यांसाठी हे फीचर फायद्याचं ठरणार आहे. या फीचरमुळे ठराविक वेळेनंतर ‘तुम्ही बराच वेळ इन्स्टाग्राम वापरत आहात, आता ब्रेक घ्या’ अशी सूचना यूझर्सना मिळणार आहे. ही सूचना किती वेळेनंतर द्यावी हे यूझर्स ठरवू शकणार आहेत. मोस्सेरी यांनी दिलेल्या माहितीनुसार, 10, 20 किंवा 30 मिनिटांच्या कालावधीमध्ये यूझर्सना हा रिमाइंडर ठेवता येणार आहे.

First published:

Tags: Instagram