नवी दिल्ली, 15 सप्टेंबर : तुमची लहान किंवा अल्पवयीन मुलं इन्स्टाग्राम
(Instagram) वापरत असतील, तर तुम्हाला सतर्क राहण्याची गरज आहे. याला कारणही तसंच गंभीर आहे. इन्स्टाग्राममुळे मुलांना मानसिक आजार
(Psychological Disease) जडत असून, त्यांना डिप्रेशनसारख्या
(Depression) विकाराला सामोरं जावं लागत आहे, असं फेसबूकनं
(Facebook) केलेल्या अंतर्गत अभ्यासातून स्पष्ट झालं आहे. इन्स्टाग्राम हे फेसबूकच्या मालकीचं फोटो आणि व्हिडीओ शेअरिंग अॅप आहे.
वॉल स्ट्रीट जर्नलने दिलेल्या वृत्तानुसार, इन्स्टाग्राम अॅप लहान मुलांसाठी हानिकारक असल्याचं फेसबूकने केलेल्या अभ्यासातून स्पष्ट झालं आहे. हे अॅप लहान मुलांवर
(Minors) कसं परिणाम करतं हे स्पष्ट करण्यासाठी वॉल स्ट्रीट जर्नलने फेसबूकच्या मागच्या तीन वर्षांच्या अभ्यासाचा हवाला दिला आहे. अल्पवयीन मुलींवर या अॅपमुळे सर्वाधिक परिणाम होत आहे. तसंच इन्स्टाग्रामचा सर्वाधिक दुष्परिणाम अल्पवयीन मुलांवर होत असून, त्यांच्या मनात यामुळे आत्महत्येचे विचार
(Suicidal Thoughts) निर्माण होतात. सुमारे 13 टक्के ब्रिटिश आणि 6 टक्के अमेरिकी युझर्सनी याविषयीचं सर्चिंगदेखील केलं आहे.
सुंदर दिसण्याच्या नादात मुलं पडताहेत आजारी
32 टक्के लहान मुलींनी सांगितलं, की इन्स्टाग्राममुळे आम्हाला शरीराविषयी खूप न्यूनगंड वाटतो. इन्स्टाग्राममुळे 14 टक्के अमेरिकी मुलं स्वतःविषयी वाईट विचार करू लागल्याचं फेसबुकलाही आढळून आलं आहे. फेसबूकला यात ज्या सर्वांत हानिकारक बाबी आढळून आल्या त्यात प्रामुख्यानं मेकअप
(Makeup) या बाबीचा समावेश आहे. अल्पवयीन मुलांना इन्स्टाग्रामवर आपण सुंदर दिसावं असं सातत्यानं वाटतं, परंतु, तसं होत नसल्यानं ते निराश होतात. इन्स्टाग्राममुळे तीनपैकी एका मुलीमध्ये बॉडी इमेजच्या अनुषंगाने समस्या वाढताना दिसत आहेत.
GPay चा UPI PIN बदलायचा आहे? ही आहे सोपी पद्धत
संशोधकांनी इन्स्टाग्राम एक्सप्लोअर पेजला इशारा दिला आहे. हे पेज इन्स्टाग्राम युझर्सना अनेक अकाउंट्सच्या क्युरेट पोस्ट देतं. त्याद्वारे ज्या गोष्टी युझर्ससाठी हानिकारक ठरू शकतात, अशा गोष्टींकडे युझर्सना आकर्षित केलं जात आहे. या अॅपमध्ये फोटोज अधिक सुंदर करण्यासाठी, तसंच लगेच पोस्ट करण्यासाठी विशेष फीचर्स आहेत. ही फीचर्स अल्पवयीन मुलांसाठी एक प्रकारचं व्यसन ठरू शकतात.
अल्पवयीन मुलांसाठी असणार इन्स्टाग्रामचं नवं व्हर्जन
फेसबूकच्या वरिष्ठ आधिकाऱ्यांनी या संशोधनाचा आढावा घेतला आहे. गेल्या वर्षी कंपनीचे सीईओ मार्क झुकेरबर्ग
(Mark Zuckerberg) यांना सादर करण्यात आलेल्या अहवालात याचा उल्लेख करण्यात आला होता; मात्र तरीदेखील युझर्स या प्लॅटफॉर्मवर गुंतून राहावेत आणि त्यांनी प्लॅटफॉर्मला वारंवार भेट द्यावी यासाठी फेसबुकने प्रयत्न सुरूच ठेवले आहेत. फेसबूक 13 वर्षांपेक्षा कमी वयोगटातल्या मुलांसाठी इन्स्टाग्रामचं नवं व्हर्जन
(Version) तयार करण्यासाठी काम करत असल्याचं वृत्त नुकतंच आलं होतं. इन्स्टाग्रामचं नवं व्हर्जन लहान मुलांसाठी सुरक्षित अनुभव देणारं असेल, असं कंपनीनं म्हटलं होतं.
आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या डिस्प्लेसह Apple Watch Series 7 लाँच, पाहा काय आहे खास, किती आहे किंमत
कंपनीनं सादर केलंय किशोरवयीन मुलांसाठी नवं धोरण
लहान मुलांच्या सुरक्षेच्या अनुषंगानं इन्स्टाग्राम गांभीर्याने पावलं उचलत आहे. अलीकडेच कंपनीनं किशोरवयीन
(Teenagers) मुलांना अज्ञात आणि संशयास्पद प्रौढ व्यक्तींपासून सुरक्षित ठेवण्यासाठी अनेक कडक उपाययोजनादेखील केल्या आहेत. इन्स्टाग्रामने नवी धोरणंही जाहीर केली आहेत. यानुसार, प्रौढ युझर्सना किशोरवयीन मुलांच्या संपर्कात राहणं अशक्य होईल; मात्र किशोरवयीन मुलांनी याचं पालन केलं नाही तर त्यासाठी कंपनीने काही फीचर्सही आणली आहेत. या फीचर्समुळे प्रौढ युझर्सच्या संशयास्पद वर्तनाबाबत त्यांच्या संपर्कातल्या किशोरवयीन मुलांना सतर्क करणं शक्य होणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.